भोज धरणावर पर्यटकाला मस्ती जीवावर बेतली!

भोज धरणावर पर्यटकाला मस्ती जीवावर बेतली!

Published on

बदलापूर, ता. ५ (बातमीदार) : बदलापूरजवळील भोज धरणातील बंधाऱ्यावर पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या पर्यटकाला पाण्याची मस्ती चांगलीच अंगलट आली. पोहण्यासाठी पाण्यात उतरलेला हा पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला. बाहेर निघण्यासाठी त्याने ओरड्यास सुरुवात केली. मित्रांच्या मदतीने त्याला पाण्याबाहेर काढण्यात आले.
बदलापूर कोंडेश्वरजवळील भोज धरणात पोहण्यासाठी आणि पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी ठाणे, रायगड, मुंबई आणि लांबून अनेक पर्यटक येथे येतात. असाच मुंबई परिसरातून आलेला एक पर्यटक खेळण्याच्या नादात पाण्यात उतरला. मात्र, अचानक पाण्याच्या वाढत्या प्रवाहात तो अडकला. यावेळी आपला जीव वाचवण्यासाठी तो आरडाओरडा करू लागला. त्यानंतर लगेचच त्याच्या मित्रांनी धाव घेत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. एकाने त्याला बंधाऱ्यावरून काठीचा आधार दिला. तर इतर पर्यटकांनी साखळी करत त्याला पाण्याबाहेर काढले. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. अशा प्रकारची पाण्यासोबतची मस्ती जीवावर बेतू शकते, याची जाणीव पर्यटकांना होण्याची गरज असल्याचे येथील ग्रामस्थांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com