गणेश मंदिर रस्त्यावर दुर्गंधी

गणेश मंदिर रस्त्यावर दुर्गंधी

Published on

गणेश मंदिर रस्त्यावर दुर्गंधी

टिटवाळा, ता. ६ (वार्ताहर) : रेल्वेस्थानकापासून गणेश मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर दुर्गंधी पसरली आहे. ड्रेनेजमधील घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील काही दिवसांपासून हिच स्थिती आहे; मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. संपूर्ण रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे; मात्र महापालिकेला प्रशासनालाच चेंबर नेमके कुठे आहे, याची माहिती नाही. या रस्त्याचा ड्रेनेज नकाशाच पालिकेकडे नाही. इतकेच नव्हे तर चेंबर शोधायला जे मेटल डिटेक्टर लागतात, तेही त्यांच्याकडे नाहीत.

ड्रेनेज विभाग आणि रस्ता विभागाचा एकमेकांशी समन्वय नाही. रस्ता करताना चेंबरच्या झाकणावर डांबर टाकल्याने पाणी साचते; परिणामी परिसरात दुर्गंधी पसरते. डास वाढतात आणि संपूर्ण परिसरात आजार पसरण्याचा धोका निर्माण होतो. याबाबत कल्याणचे शिवसेना उपशहरप्रमुख विजय देशेकर यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका करताना म्हटले, की पालिकेच्या अधिकाऱ्यांना रस्त्याखालील ड्रेनेज चेंबर कुठे आहेत, हेच ठाऊक नाही. संपूर्ण रस्त्याचा ड्रेनेज नकाशा महापालिकेकडे उपलब्ध नाही, अशी धक्कादायक माहिती देशेकर यांनी समोर आणली आहे. इतकेच नाही तर चेंबर शोधण्यासाठी आवश्यक असलेले मेटल डिटेक्टरही पालिकेकडे नसल्याची कबुलीही त्यांनी दिली.

याबाबत मलनिस्सारण विभागाचे अधिकारी घनश्याम नवांगुळे यांनी सांगितले, की पालिकेचे अभियंता ईनामदार यांना सूचना दिल्या आहेत; मात्र त्यांच्यांकडून अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही. तर अभियंता ईनामदार यांनी सांगितले, की आमचा कर्मचारी रवि जाधव यांना या कामासाठी पाठवले असून काम सुरू आहे. तसेच त्यांनी या वेळी कबूल केले, की जेव्हा रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले, तेव्हा ड्रेनेज चेंबरवर उचलण्याची प्रक्रिया केली नाही. त्यामुळे आता चेंबर शोधणे आणि उघडणे हेच मोठे आव्हान ठरत असल्याचे म्हटले.

प्रशासनाची हलगर्जी
एका चुकीमुळे संपूर्ण रस्त्याची ड्रेनेज व्यवस्था कोलमडली आहे; मात्र नागरिक रोजच्या रोज गलिच्छ पाण्यातून वाट काढत आहेत. प्रशासनातील या हलगर्जीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. विजय देशेकर यांनी उपस्थित केलेले प्रश्न प्रशासनाच्या कामशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. प्रशासनाने तत्काळ ड्रेनेज मॅप तयार करून उपाययोजना न केल्यास येत्या काळात आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com