जलकुंभ नव्याने बांधण्याचे आदेश
पालघर, ता. ५ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील मौजे सुकडआंबा येथील जलजीवन मिशनअंतर्गत उभारण्यात आलेल्या शिरसोनपाडा वस्तीवरील पाण्याच्या टाकीचा स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिनींचा मृत्यू आणि एक मुलगी जखमी होण्याची घडली होती. या घटनेप्रकरणी जिल्हा परिषदेमार्फत कारवाई करीत कंत्राटदाराला तिन्ही टाक्या नव्याने बांधण्याचे आदेश दिले आहेत.
सुकडआंबा येथील दुर्घटनेनंतर व्ही.जे.टी.आय. या संस्थेत स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी नियुक्त करण्यात आले होते. प्राप्त स्ट्रक्चरल ऑडिट अहवालात संबंधित साठवण टाक्यांच्या संरचनेत गंभीर बांधकाम दोष आढळून आले. या आधारे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी संबंधित कंत्राटदाराला तिन्ही साठवण टाक्या पाडून नव्याने बांधण्याचे तत्काळ आदेश दिले आहेत. याचबरोबर कंत्राटदाराविरोधात कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यास काळ्या यादीत समाविष्ट करण्यासंदर्भात नोटीस काढण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.