धोकादायक शालेय प्रवास थांबणार
पालघर, ता. ५ (बातमीदार) : जिल्ह्यातील दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना नद्या, ओढे आणि बंधाऱ्यांवरून शाळेत जाण्यासाठी धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या घटनांकडे प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधल्यानंतर जिल्हा परिषदेने तातडीने उपाययोजना केल्या. तीन ठिकाणांवरील एकूण ५४ विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित निवासाची आणि नियमित शिक्षणाची व्यवस्था करण्यात येत आहे.
वाड्यातील २५ विद्यार्थ्यांना दिलासा
वाडा तालुक्यातील नाकाडपाडा आणि झुगरेपाडा येथील विद्यार्थी दररोज गारगाई नदीवरील बंधाऱ्यावरून गारगाव शाळेत जात होते. पावसाळ्यात हा मार्ग अधिक धोकादायक ठरत होता. गुरुवारी (ता. ३) ही बाब समोर आल्यानंतर गटविकास अधिकारी वैभव शिंदे व गटशिक्षणाधिकारी उमेश सातपुते यांनी पालकांशी चर्चा केली. त्यानंतर २५ विद्यार्थ्यांना गारगाव शासकीय आश्रमशाळेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
१४ विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहात प्रवेश
रायकरपाडा येथील विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल, सोनाळे आणि जिल्हा परिषद शाळा, कापरी येथे शिकण्यासाठी नदी व ओढ्यांतून प्रवास करीत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या निर्देशानुसार पाहणी करून सात मुलांना संत रोहिदास वसतिगृह, सोनाळे येथे तर सात मुलींना कळंबे येथील शासकीय आश्रमशाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात येणार असून पालकांच्या संमतीनंतर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.