श्री माहेश्वरी महिला समितीची कार्यकारिणी घोषित
भिवंडी, ता. ५ (वार्ताहर) : शहरात उद्योग-व्यवसायानिमित्त मोठ्या संख्येने राजस्थान येथील माहेश्वरी समाज वास्तव्यास आहेत. या समाजातील महिलांना संघटित करणाऱ्या श्री माहेश्वरी महिला समितीच्या नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
श्री माहेश्वरी मंडळ, भिवंडीचे अध्यक्ष ओमप्रकाश भूतडा, सचिव कन्हैयालाल पेडीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शशी मोहता, पुष्पा बलदेवा व मंगला सोमानी यांच्या व्यवस्थापनाखाली वार्षिक सर्वसाधारण सभेत तीन वर्षांसाठी महिला मंडळ पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये महिला मंडळाच्या अध्यक्षपदी बबिता द्वारकाप्रसाद असावा, उपाध्यक्ष सुनीता राठी, सचिव सीमा जागेटिया, सहसचिव उज्ज्वला सारडा, खजिनदार सरोज पेडीवाल, सांस्कृतिकमंत्री सीमा झंवर, संघटन मंत्री संगीता बिहानी व कार्यकारिणी सदस्यपदी रेखा असावा, प्रीती लाहोटी, संगीता गट्टाणी, तरुणा कांकाणी, शिल्पा असावा, बिंदू सोनी, नीता सारडा, सुधा सारडा, निर्मला झंवर, सुमन लोहिया, सरिता मुंदडा, सीमा जाखोटिया, नीला भूतडा, रेखा लोहिया, तनुजा गगड, सरोज बजाज, कीर्ती बिर्ला, सरिता बजाज यांचा समावेश आहे. महिला मंडळाच्या माध्यमातून पुढील काळात विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगत नवनिर्वाचित अध्यक्षा बबिता द्वारकाप्रसाद असावा यांनी सर्व महिला सभासदांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.