पेण पोलिस वसाहतीसह स्थानकारिता निधी मंजूर करा

पेण पोलिस वसाहतीसह स्थानकारिता निधी मंजूर करा

Published on

पेण पोलिस वसाहतीसह स्थानकारिता निधी मंजूर करा
सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांची शासनाकडे मागणी
पेण, ता. ५ (वार्ताहर) : पोलिस अधिकारी, कर्मचारी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी चोवीस तास डोळ्यांत अंजन घालून काम करत आहेत, मात्र त्‍यांच्‍या मूलभूत गरजांकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पेण येथील पोलिस वसाहतींची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्‍यामुळे शासनाने वसाहतीसह पेण पोलिस ठाणे कार्यालयाकरिता तत्काळ निधी उपलब्ध करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील बौद्धनगर जवळ आणि पेण पोलिस ठाणे शेजारी असणाऱ्या पोलिस वसाहतीची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. येथील इमारत पूर्णतः धोकादायक स्थितीमध्ये झाली आहे. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांची वसाहत सुसज्ज व्हावी तसेच पोलिस स्‍थानकाच्या नव्या इमारतीची निर्मिती व्हावी, यासाठी २०१९ रोजी शासन स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालय, रायगड यांच्या कार्यालयातसुद्धा बैठक झाली. त्या वेळी येथील वासाहत व इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करून पाडण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने आदेश दिले होते, परंतु याकडे शासनाचे लक्ष नसल्याने दिवसेंदिवस इमारतीची दुरवस्था होत चालली आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन पेण पोलिस वसाहत आणि पेण पोलिस ठाणे कार्यालयाकरिता तत्काळ निधी उपलब्ध करावा, अशी मागणी पुन्हा सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने रुजू झालेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक आंचल दलाल या समस्येकडे गांभीर्याने पाहतील, अशी आशा पोलिस कर्मचाऱ्यांना आहे.
.....................
कोट
२०२१ रोजी पोलिस वसाहतीची पूर्ण पाहणी करून त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे, मात्र निधीसाठी शासनाकडून अथवा पोलिस खात्याकडून या इमारतीच्या बांधकामासंदर्भात अजूनपर्यंत कोणतीच हालचाल झालेली नाही. या बांधकामासाठी निधीची तरतूद झालेली नाही.
- डी. एम. पाटील, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, पेण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com