सेवा रस्त्यावरून ग्रामस्थ आक्रमक

सेवा रस्त्यावरून ग्रामस्थ आक्रमक

Published on

भिवंडी, ता. ४ (वार्ताहर)ः मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघाजवळ सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. तरीदेखील टोलवसुली केली जात असून, ठेकेदारांकडून दुर्लक्ष होत असल्याने आक्रमक झालेल्या ठाकरे गटाने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
पडघा व भादाणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वरील सेवा रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व टोलवसुली करणाऱ्या ठेकेदारांकडे तक्रारीनंतरही दुर्लक्ष केले जात आहे. खराब रस्त्यामुळे वाहतुकीच्या विविध समस्या निर्माण होत असून, आबालवृद्ध, विद्यार्थी, रुग्णांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराला महामार्ग प्रशासन जबाबदार असून, सात दिवसांच्या आत नादुरुस्त रस्ते तसेच भुयारी मार्गाची दुरुस्ती करावी अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा प्रकाश भोईर यांनी निवेदनातून दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com