लैंगिक शिक्षण अभियानास सुरुवात

लैंगिक शिक्षण अभियानास सुरुवात

Published on

लैंगिक शिक्षण अभियानास सुरुवात
खोपोली, ता. ५ (बातमीदार) ः सहज सेवा फाउंडेशनच्या वतीने समाजात नानाविध उपक्रम राबविले जातात. खोपोली परिसरातील शाळा व महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी लैंगिक शिक्षण हा उपक्रम समाजातील काळाची गरज आहे. या भावनेने या उपक्रमाचा हिंदी विद्यालय, खोपोली येथून शुभारंभ करण्यात आला. शाळेत व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनीमध्ये सामाजिक समस्या, लैंगिक समस्या व शंका असतात. आजही समाजात मोकळेपणाने या विषयावर संवाद साधला जात नाही. समाजात असलेल्या अज्ञानामुळे विपरीत परिणामसुद्धा शालेय व महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर होत असतात. सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून शुक्रवारी (ता. ४) शहरी व ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी समुपदेशन व लैंगिक शिक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com