तक्रारी कमी होण्यास मदत

तक्रारी कमी होण्यास मदत

Published on

सानपाडा येथे विद्युत मीटर बदलण्याच्या घाट
रहिवासी सोसायट्यांना नोटिसा; नागरिकांमध्ये नाराजी
जुईनगर, ता. ५ (बातमीदार) : सानपाडा येथील काही रहिवासी सोसायट्यांना विद्युत मीटर बदलण्यासाठी नोटीस वजापत्र देण्यात आली आहेत. सेक्टर-२ मधील नीलकंठ व शिवसागर तर सेक्टर-८ मधील क्षिप्रा सोसायटी या तीन सोसायट्यांना दोन दिवसांपूर्वी नोटीस देण्यात आल्या आहेत. शिवाय त्वरित मीटर बदलण्याचे सांगण्यात आले आहे, मात्र येथील रहिवाशांनी विरोध केल्याने अद्याप मीटर बदलण्यात आलेले नाहीत. त्‍यामुळे जुने मीटर सुरू असताना नवीन बदलण्याचा घाट का घातला जात आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मीटर बदलाने नागरिकांवर विनाकारण भुर्दंड लादण्याचा हा प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहेत, तर हे मीटर केंद्र शासनाच्या योजनेतील असल्याने याचा कोणताही भुर्दंड नागरिकांना पडणार नसल्याचे महावितरण सांगत आहेत, मात्र भविष्यात देयकात याची रक्कम लावून आल्यास काय करायचे, अशी चिंता नागरिकांना सतावत आहे. तसेच मीटर कधीपासून बदलण्यात येणार आहेत?, मीटर बदलण्याचे फायदे-तोटे यासंदर्भात महावितरणमार्फत जनजागृती होणे आवश्यक आहे. सध्या स्थितीमध्ये चालू असलेले जुने मीटर विनाकारण बदलून नवीन इलेक्ट्रॉनिक मीटर बसवण्याचा घाट घातला जात आहे. ही सामान्य नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी असल्याचे बोलले जात आहे. त्‍यामुळे या विद्युत मीटर बदलाविरोधात सक्‍ती करण्यात आली, तर अखिल सानपाडा रहिवासी महासंघ आणि शिवसेना उबाठा गट रहिवाशांच्या मागे उभे राहणार असल्याचे विभागप्रमुख अजय पवार यांनी सांगितले.
.....................
तक्रारी कमी होण्यास मदत
केंद्र सरकारची आरडीएसएस ही योजना असून, त्याअंतर्गत हे स्मार्ट मीटर आपण बदलून घेत आहोत. ते बदलण्यासाठी ही नोटीस दिली आहे. या मीटरमध्ये ग्राहकांसह सेवा देणाऱ्यांचाही फायदा आहे. जुन्या पद्धतीच्या मीटरसारखेच हे नवीन मीटर आहे. यात ग्राहकालादेखील त्याचा प्रतिदिन वापर मोबाईलवर कळणार आहे. शिवाय यातून तक्रारी कमी होण्यास मदत होणार आहे. नेमके रीडिंग उपलब्ध होऊन देयकातील तक्रारी कमी होतील, असे महावितरणचे अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com