हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांवर गुन्हा

हुंड्यासाठी छळ करणाऱ्यांवर गुन्हा

Published on

भिवंडी, ता. ५ (वार्ताहर)ः माहेरहून पैसे आणले नसल्याने पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेला टोमणे मारण्यासह तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला माहेरी आणून सोडल्याची घटना नागाव परिसरातून समोर आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित सुमैया अन्सारी (२२) गैबीनगर परिसरात राहत असून २०२३ मध्ये शाहबाज याच्याशी लग्न झाले आहे. नागाव रोड येथे सलामतपुरामधील सायरा अपार्टमेंट येथील घरी नांदत असताना सुमैयाने माहेरहून हुंड्यात कमी पैसे आणल्याने तसेच माहेरच्यांनी फ्लॅट, गाडी दिली नाही. या कारणावरून सासरच्या मंडळींनी आपापसात संगनमताने पीडित विवाहितेला सतत टोमणे मारून शिवीगाळसह मारहाण केली आहे. तसेच पती शाहबाजने पीडितेला तिच्या माहेरी सोडल्याने मानसिक जाचाला कंटाळून विवाहितेने शांतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com