ग्यानबा तुकारामाचा किन्हवलीत गजर

ग्यानबा तुकारामाचा किन्हवलीत गजर

Published on

किन्हवली, ता.५(बातमीदार)ः आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील वारकरी विठूरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. ५) किन्हवली गावात लहानग्यांनी वारकऱ्यांच्या वेशात वृक्षदिंडी काढली.
किन्हवलीतील आदर्श विद्यामंदिर व पी.एस.धानके इंग्लिश मिडीयम स्कूल यांनी ओखोरे व परिधी आगिवले यांच्या रुपाने साक्षात बालरुपातील विठ्ठल-रुक्मिणी प्रकट झाल्याचे पहावयास मिळाले. आदर्श विद्यामंदिरच्या प्रांगणात ‘ग्यानबा तुकारामचा गजर’ करत शेकडो विद्यार्थ्यांनी गोल रिंगण केले. आदर्श विद्यामंदिरपासून सुरु झालेली ही दिंडी शहापूर-मुरबाड रस्त्यावरुन बसस्थानक, हनुमाननगर, छ. शिवाजी मार्केट, शिवमंदिर, ग्रामपंचायत कार्यालय, शहा विद्यालय मार्गे पुन्हा मैदानावर पोहोचली. यावेळी वृक्षारोपणाच्या घोषणा देवून विद्यार्थ्यांनी नागरिकांना झाडे लावण्याचे आवाहन केले. या दिंडीसोबत सेल्फी काढून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वृक्षदिंडीत पार्वती शंकर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू धानके, आदर्शच्या मुख्याध्यापिका सुजाता धानके तसेच वारकरी वेशातील ५०० हून अधिक विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com