तुझा एक थेंब ह्या पुस्तकाचे प्रकाशन
‘तुझा एक थेंब’ पुस्तकाचे प्रकाशन
विरार, ता. ५ (बातमीदार) ः मिरा-भाईंदरचे एसीपी डॉ. विवेक मुगळीकर यांच्या सेवापूर्ती सन्मान सोहळ्यात डिंपल प्रकाशनतर्फे त्यांच्या ‘तुझा एक थेंब’ या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे. संत तुकाराम महाराज यांचे वंशज आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते हे प्रकाशन पिंपरी-चिंचवड येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात झाले.
या वेळी संत एकनाथ महाराज यांचे वंशज हभप योगिराज पैठणकर (श्री क्षेत्र पैठण), पुण्याचे महसूल विभाग आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, मराठवाडा मित्रमंडळचे कार्याध्यक्ष डॉ. भाऊसाहेब जाधव, पिंपरी-चिंचवडचे पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि डिंपल प्रकाशनचे अशोक मुळे उपस्थित होते. सत्कार सोहळा आयोजन समितीतर्फे प्रास्ताविक ज्येष्ठ लेखक डॉ. रवींद्र तांबोळी यांनी केले. या वेळी नागपूरचे न्यायाधीश विनय मुगळीकर आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.