जुना पूल वाहतुकीसाठी बंद

जुना पूल वाहतुकीसाठी बंद

Published on

कर्जत-कल्याण मार्गावरील जुना पूल वाहतुकीसाठी बंद
नेरळजवळील पूल तातडीने बंद करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय
कर्जत, ता. ५ (बातमीदार) ः कर्जत-कल्याण राज्यमार्गावर नेरळजवळील जुना पूल अखेर बंद करण्यात आला आहे. या पुलाचा दगडी संरचनेत तळभाग खचला आहे. यामुळे हा पूल तत्काळ वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने निर्णय घेतला आहे. सध्या वाहतूक शेजारील नव्या पुलावरून सुरू आहे.
कर्जत-कल्याण राज्यमार्गावर ७६ वरील नेरळ पोलिस ठाण्याजवळ पुलाला जवळपास ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. जून महिन्याच्या अखेरीस पुलाचा काही भाग अचानक पाण्यात कोसळल्याने खळबळ उडाली. या पुलावरून दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू होती. त्यामुळे झीज झपाट्याने वाढल्याचे स्पष्ट झाले. स्थानिकांनी ही बाब तातडीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर या पुलाची स्ट्रक्चरल पाहणी करण्यात आले होते. पाहणीदरम्यान पुलाच्या कर्जतकडील खांबाच्या तळभागात मोठी झीज झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर रात्री उशिरा पूल बंद करण्यात आला. याबाबतची माहिती मंगळवारी (ता. १) सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप चव्हाण यांनी दिली.
दरम्यान, या प्रकरणावर समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असल्या तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजनबद्धपणेच तपासणी करून निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही बाब अधिकृत पत्राद्वारे जिल्हा माहिती कार्यालयालाही सांगितली आहे. या घटनेमुळे जुन्या पुलांच्या स्थितीकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत वेळीच निर्णय घेणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कौतुक होत आहे.

पर्यायी पूल बनला पर्याय
या जुन्या पुलालगतच चार वर्षांपूर्वी नवीन आर.सी.सी. पूल बांधण्यात आला होता. त्यामुळे वाहतूक त्या पुलावर वळविण्यात आली. सुरुवातीला नव्या पुलावर वाहनांच्या अनधिकृत पार्किंगमुळे अडथळा निर्माण झाला होता, मात्र उरण सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता राजरत्न रणदिवे यांनी तत्काळ हस्तक्षेप करून पार्किंग हटवले आणि वाहतूक सुरळीत केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com