दादासाहेब मो . कृ. वाणी विद्यालयात साक्षरतेची दिंडी

दादासाहेब मो . कृ. वाणी विद्यालयात साक्षरतेची दिंडी

Published on

वाणी विद्यालयात साक्षरतेची दिंडी
डोंबिवली, ता. ५ : दादासाहेब मो. कृ. वाणी प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांची दिंडी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषेत मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. विठूरायाची पालखी घेत साक्षरता अभियानाचा संदेश दिला. हरिनामाचा गजर तसेच विविध भजन व अभंग म्हणत ज्ञान मंदिर विद्या संकुल ते गणेश मंदिर निवासी विभागातून दिंडी काढण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांना सकाळ एनआयई अंकाचे वाटप करण्यात आले. तसेच सकाळ प्रतिनिधीमार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळेच्या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दीपक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com