श्वानांचे निर्बिजीकरण खोळंबले

श्वानांचे निर्बिजीकरण खोळंबले

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : शहरातील भटके कुत्रे आणि मांजरी यांची पैदास नियंत्रणात आणणारी योजना पालिकेच्या प्रस्तावातील त्रुटीमुळे खोळंबल्याचे उघडकीस आले आहे. २०१७ च्या धर्तीवर काढण्यात आलेल्या या निविदेत बदल करून आता नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत २००४ ते २०१९पर्यंत आठ कोटी खर्चून ५८ हजार ५३७ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले होते. कोरोनाकाळानंतर मागील दोन वर्षांपासून निर्बिजीकरणाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्याअंतर्गत रेबीज लस देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात २०२३ मध्ये ८००६ आणि जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत ४३०५ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. मागील वर्षी रेबीजचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी घेण्यात आलेल्या मोहिमेत
सात हजार ४०९ भटक्या कुत्र्यांचे लसीकरण केल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
नव्याने निर्बिजीकरणाची शस्त्रक्रियेचा प्रस्ताव तयार करण्यासाठी आरोग्य विभागाला तब्बल दीड वर्षाचा कालावधी लागल्याची माहिती समोर आली आहे. भटक्या श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया व लसीकरण करणे, भटक्या मांजरीची नसबंदी, शस्त्रक्रिया व लसीकरण, भटके श्वान व मांजरीवर उपचार, रेबीज लसीकरण वार्षिक कार्यक्रम, प्राणी मनुष्य संघर्ष टाळण्यासाठी माहिती प्रसारण करणे आदी गोष्टींचा समावेश होता. त्यानुसार अभिव्यक्ती स्वारस्य देकार मागविण्यात आला होता. परंतु, हा प्रस्ताव तयार करत असताना संबंधित विभागातील काही अधिकाऱ्याच्या चुकांमुळे यात टाकण्यात आलेले दर हे २०१७ मधील असल्याची माहितीही समोर आली आहे.

प्रचलित दरानुसार नवीन निविदा
प्रशासकीय महासभेत मंजूर झालेला प्रस्ताव रद्द केला आहे. आता नव्याने निविदा काढण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार प्रचलित दरानुसार निविदा काढली जाणार असून, इतर तांत्रिक अडचणी दूर केल्या जाणार आहेत. त्यानुसार शहरात ५० हजार भटके कुत्रे लक्षात घेऊन त्यानुसार १५ दिवसांत नवीन निविदा काढली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मांजरींच्या निर्बिजीकरणास नकार
ठाण्यात मांजरींचा वावर वाढल्याने त्यांच्याही निर्बिजीकरणाचा उपक्रम ठाणे महापालिकेने घेतला होता. मात्र, त्यांच्या निर्बिजीकरण आणि लसला प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते. दरम्यान श्वानांच्या निर्बिजिकरणासाठी पालिकेने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काही ठेकेदारांकडून पुढे करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com