करावे गाव म्हणजे प्रति पंढरपूर

करावे गाव म्हणजे प्रति पंढरपूर

Published on

करावे गाव म्हणजे प्रतिपंढरपूर
तुर्भे, ता ५ (बातमीदार) ः करावे गावात पुरातन विठ्ठल-रखुमाई मंदिर असून, आषाढी एकादशीला येथे फार मोठा भक्ती सोहळा रंगला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात करावे हेच साष्टीवासीयांचे पंढरपूर होते. एकादशीला येथे गावोगावच्या दिंड्या येत असत. या दिंडीत सहभागी झालेल्या विठ्ठलभक्तांचे करावे गावातील ग्रामस्थ मोठ्या डामडौलाने स्वागत करीत असत. आता जरी इतर गावातील दिंड्यांचे प्रस्थान होत नसले तरी नरेंद्र महाराज यांची दिंडी मात्र आजही नित्यनेमाने या ठिकाणी येते.
आषाढीला रंगणारा हा सोहळा पाहण्यासाठी येथील सासुरवाशिणी चार दिवस आधीच आपल्या माहेरी येतात. गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिर इतिहासाची साक्ष देत नवी मुंबईतील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. १९१६ मध्ये मंदिराची उभारणी करण्यात आली. १९८४ रोजी विठ्ठल-रखुमाई मंदिराची ट्रस्टी स्थापित करण्यात आली. विशेष म्हणजे मंदिर उभारणी व जीर्णोद्धार झाले असले तरी गाभाऱ्यातील देवी-देवतांच्या मूर्त्री १९१३ रोजी स्थापन केल्या आहेत, त्या आजही तशाच ठेवण्यात आल्या आहेत, तर १९९० रोजी मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर पुन्हा २००४ मध्ये डागडुजी करण्यात आली. कृष्णा बामा पाटील हे मंदिर समितीचे पाहिले अध्यक्ष राहिले. त्यांनतर दर पाच वर्षांनी मंदिर समितीचे अध्यक्षपदाची निवड नव्याने केली जाते. मंदिर समितीचा कारभार हा अतिशय पारदर्शकतेने पहिला जातो. अमलीका एकादशीला देवाची पालखी उत्सव साजरा केला जातो, याशिवाय संपूर्ण गावातून पालखी मिरवणूक काढली जाते. १९१३ पासून कृष्ण जन्माष्टमीनिमित्ताने हरिनाम सप्ताहाचे अयोजन केले जाते. कार्तिकी एकादशीला पंढरपूरच्या धर्तीवर पहाटे काकडा आरती, भूपाळी हे धार्मिक कार्यक्रम कार्तिक महिन्यात आयोजित केले जातात. तसेच आषाढी एकादशीलादेखील मोठा उत्सव साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com