पे अँड पार्क सुविधा होणार पूर्ववत
पे अँड पार्क सुविधा होणार पूर्ववत
मुलुंड शिवसेना, नागरिकांतर्फे वाहतूक विभागाला निवेदन
मुलुंड, ता. ५ (बातमीदार) : मुलुंड (पूर्व) रेल्वेस्थानकाबाहेरील महापालिका अखत्यारीतील दुचाकी पे ॲँड पार्क गेल्या अनेक महिन्यांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद आहे. परिणामी दुचाकीस्वारांना आपली गाडी पार्क करताना अनेक अडचणी येत आहेत. याबाबतच्या असंख्य तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याबाबत मुलुंडचे शाखाप्रमुख अमोल संसारे यांनीही वाहतूक विभागाकडे तक्रार करत पार्किंगचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.
पार्किंगची समस्या असल्यामुळे दुचाकीस्वार आपली वाहने इतर ठिकाणी पार्क करतात. त्यानंतर वाहतूक विभागातर्फे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. वाहनधारकांना हा नाहक भुर्दंड असून, मुलुंड पूर्वेतील पे अँड पार्क सुविधा, टी विभाग पालिका प्रशासनाने पुन्हा पूर्ववत करावी, अशी मागणी येथील दुचाकीस्वारांनी केली आहे. त्यानंतर टी विभाग पालिकेच्या संबंधित विभागाने लेखी पत्राद्वारे या ठिकाणी असलेली तांत्रिक अडचण लवकरच दूर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
नागरिकांच्या तक्रारीनंतर मुलुंड पूर्व रेल्वेस्थानकाबाहेरील भूमिगत पे अँड पार्क सुविधा लवकरच पूर्ववत करण्यात येणार असल्याेचही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार याबाबत सहाय्यक अभियंता (इमारत व कारखाने) टी विभाग कार्यालयामार्फत सदर ठिकाणी पे ॲन्ड पार्क चालविण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यासाठी ई-निविदा दरपत्रिका मागविण्याची कार्यवाही प्रगतिपथावर असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.