डोंगरीपाडा पार्कच्या जागेवर मेट्रो स्थानक

डोंगरीपाडा पार्कच्या जागेवर मेट्रो स्थानक

Published on

डोंगरीपाडा पार्कच्या जागेवर मेट्रो स्थानक
प्रशासकीय महासभेत प्रस्तावाला हिरवा कंदिल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : मेट्रो ४ वरील कॅडबरी ते गायमुख मार्गावरील डोंगरीपाडा स्थानकासाठी अखेर जागा मिळाली आहे. ठाणे महापालिकेच्या पार्कसाठी आरक्षित असलेला भूखंड आता डोंगरीपाडा मेट्रो स्थानकासाठी देण्यात येणार आहे. यासंदर्भाच्या ठरावाला प्रशासकीय महासभेत हिरवा कंदील मिळाला आहे. ठाण्याला भेडसावणारी वाहतूक कोंडी फोडणारी मेट्रो प्रत्यक्षात कधी धावणार, याची प्रतीक्षा ठाणेकर करत आहेत.

मोघरपाडा कारशेडचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर आता या प्रकल्पाला गती आणण्याचे प्रयत्नही सुरू झाले आहेत. २०२६ पर्यंत मेट्रो ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्याची धडपडही सुरू झाली आहे. त्यासाठी मेट्रोच्या मार्गात येणारे प्रत्येक अडथळे दूर करण्यात येत आहेत. यापैकीच एक अडथळा असलेला डोंगरीपाडा स्थानकाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

मार्गावरील मेट्रो स्थानकासाठी मौजे कोलशेत येथील डोंगरीपाडा स्थानकाच्या बांधकामासाठी पार्क आरक्षण क्रमांक १ अंतर्गत ताब्यात आलेल्या क्षेत्रापैकी ४०६.७७ चौरस मीटर क्षेत्र मेट्रो स्थानकासाठी हस्तांतरीत करणे आवश्यक होते. त्यानुसार एमएमआरडीएनेदेखील ही जागा देण्याची मागणी ठाणे महापालिकेकडे केली आहे. या भूखंडाचे ३६५० चौरस मीटर एवढे क्षेत्र महापालिकेच्या नावे झाले असून, त्यापैकी ४०६.७७ चौरस मीटर क्षेत्र हे आता कायमस्वरूपी एमएमआरडीएला दिले जाणार आहे; मात्र हा भूखंड विकत न देता
भाडेतत्त्वावर देण्यात येणार आहे. तसा ठराव प्रशासनाच्या महासभेत मंजूर झाला आहे.

१० टक्के वाढ अपेक्षित
११ लाख ८१ हजार वार्षिक भाडे ४०६.७७ चौरस मीटर क्षेत्राची एकूण किंमत पाहता ती एक कोटी तीन लाख ३१ हजार ९५८ एवढी होते, परंतु आता ही जागा विकत न देता भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार वार्षिक ११ लाख ८१ हजार ९७६ रुपये भाडे आकारले जाणार आहे. तसेच या भाड्यात प्रतिवर्ष १० टक्के प्रतिकात्मक वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com