मिलिंदनगर, गौरीपाड्यातील रस्ते खड्डेमय
मिलिंदनगर, गौरीपाड्यातील रस्ते खड्डेमय
कल्याण, ता. ६ (वार्ताहर) ः महापालिका क्षेत्रातील ब प्रभागामधील मिलिंदनगर ते गौरीपाडा तलाव रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे अपघात झाल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल नागरिक करीत आहेत.
मिलिंदनगर ते गौरीपाडा या परिसरात झोपडपट्टी भागासह मोठमोठी बहुमजली संकुले उभी राहिली आहेत. या परिसराचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. परिसरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चाकरमान्यांसह विद्यार्थी, नागरिकांची मोठी वर्दळ रस्त्यावर नेहमीच असते. तसेच खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालकांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही महिन्यांपूर्वीच रस्त्यातील खड्डे प्रश्नावरून आंदोलन केले होते. त्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली; मात्र अवघ्या दहा महिन्यांच्या कालावधीत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे.
खड्डेयुक्त रस्त्यावरून सतत प्रवास करावा लागत असल्याने चालकांना पाठ, मणक्याचे आजार उद्भवत आहेत. तसेच रस्त्याच्या दुतर्फा गटारे नसल्याने रस्त्यावरील पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाणी रस्त्यावरच साचते. हेच रस्त्याच्या दुरवस्थेचे मुख्य कारण आहे. गौरीपाडा प्रभागाचे माजी नगरसेवक दया गायकवाड हे रस्त्यासंदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. त्यांनी रस्ताच्या दुरुस्तीचे काम मार्गी लावल्याचे सांगितले. तर कल्याण-डोंबिवली महापालिका कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जगदीश कोरे यांनी सांगितले, की ठेकेदाराकडून संबंधित रस्त्यावर पेव्हर ब्लाॅक बसवणे, तसेच रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.