प्रतिपंढरपूरात भाविकांचा मेळा
शिवडी, ता. ६ (बातमीदार)ः वडाळ्यातील प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या चारशे वर्षांहून अधिक काळ जुन्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने जय्यत तयारी सुरू आहे. टाळ-मृदंगाच्या आवाजाने मंदिर परिसर गजबजला असून, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्वच सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. यंदा सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.
वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक दर्शनासाठी येतात. याच अनुषंगाने आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवारी (ता. ६) मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिर प्रशासन तसेच पोलिसांतर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर परिसरात पोलिसांची कुमक, सीसीटीव्ही कॅमेरे, मंदिराच्या प्रवेशद्वारा टेहाळणी कक्ष तसेच आपत्कालीन व्यवस्थापनाची सुरक्षा ठेवली आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने मंदिराचे स्वयंसेवक असणार आहेत, अशी माहिती मंदिर व्यवस्थापनाने दिली.
------------------------------------------
एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा
आषाढी एकादशीच्या पहाटे रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महापूजा आणि अभिषेक करण्यात येणार आहे. तसेच मंदिरात दशमी आणि आषाढी एकादशी या दोन दिवसांकरिता भजनी मंडळाची नोंद करण्यात आली आहे.
़़़़़ः--------------------------------------
वाहतूक मार्गात बदल
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार काही मार्ग बंद करण्यात आले असून, ५ जुलै सायंकाळी ६ वाजता तसेच ७ जुलै रोजी सकाळी ८ पर्यंत हा बंदी आदेश लागू असणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.