ऑलिंपिकच्या दिशेने पालघरची कूच

ऑलिंपिकच्या दिशेने पालघरची कूच

Published on

प्रसाद जोशी, वसई
विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास साधता यावा, यासाठी विविध योजना सुरू आहेत. अशातच राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होऊ लागले आहेत. त्यांना ऑलिंपिकमध्ये जाण्यासाठी बळ मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पालघर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय जलतरण केंद्र व यासह राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या विविध खेळांचा सराव करता यावा, म्हणून पालघर जिल्हा क्रीडा विभागाकडून आखणी करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात पालघरच्या नकाशावर सातासमुद्रापार झेंडा रोवणारे जिल्ह्यातील अनेक खेळाडू दिसण्याची शक्यता आहे.

पालघर क्रीडा विभाग जिल्हा क्रीडा संकुल विकसित करीत आहे. पालघर जिल्ह्याचे क्रीडा संकुल नोव्हेंबरपर्यंत पूर्णत्वास येणार आहे. त्यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील खेळाडूंना मिळणार आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंनासुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खेळाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. खेलो इंडिया खेलोमध्ये पालघर जिल्ह्याने पदक मिळवले, तर जलतरणमध्येदेखील राष्ट्रीय स्तरावर नेहा अहिवाल, सायकलिंगमध्ये ४०० मीटर धावणे स्पर्धेत इशा जाधव यांच्यासह अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला. २०२३-२४ मध्ये जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर २०२४-२५ मध्ये स्पर्धकांची वाढ लक्षणीय असल्याचे दिसून येत आहे.

२०३२ ऑलिंपिकमध्ये पालघर जिल्ह्यातील खेळाडू नेतृत्व करतील, असा विश्वास हा नुकत्याच क्रॉस कंट्री धावणे व बॅडमिंटन स्पर्धेत उपस्थित झालेल्या आंतरराष्ट्रीय धावपटू स्नेहल राजपूत यांनीदेखील व्यक्त केला. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा विभागाकडून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उतरता यावे, यासाठी प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि अन्य सुविधा याकडे लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात ऑलिंपिकच्या दिशेने पालघर जिल्ह्यातील खेळाडू जाऊन चकमदार कामगिरी करतील, अशी आशा बाळगली जात आहे.

क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय स्पर्धेप्रमाणे सराव करण्यासाठी जलतरण तलाव उभे राहणार आहे. सद्यस्थितीत केवळ वसईत महापालिकेच्या जलतरण केंद्रात स्पर्धा घेतल्या जात आहेत, तर बॅडमिंटन कोर्ट हे खासगी आहेत. त्यामुळे क्रीडा संकुलात बॅडमिंटन, टेनिस खेळांसाठी उभारणी केली जाणार आहे. याचबरोबर जिम्नॅशियमसह विविध खेळांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात राष्ट्रीय स्पर्धा या पालघर जिल्ह्यात होऊ शकतात व त्याचा फायदा येथील नवस्पर्धकांना होऊ शकणार आहे.

खेळाडूंसाठी वसतिगृह
ग्रामीण भागातील खेळाडू हे तालुका स्पर्धेसाठी येतात; मात्र स्पर्धेला अधिक उशीर झाला तर त्यांना शहर ते गाव हा प्रवास करताना जास्त वेळ लागतो. त्यामुळे अशा खेळाडूंसाठी वसतिगृह उभारले जाणार आहे. ते राज्यस्तरीय स्पर्धेसाठीदेखील उपयोगी ठरणार आहे. या वसतिगृहात खेळाडूंसाठी सुविधा असणार आहे.

आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू, प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागातील मुले क्रीडा संकुलात स्पर्धेसाठी येणार आहेत. त्यामुळे त्यांना राहण्यासाठी वसतिगृहाची व्यवस्थादेखील होणार असून पालघर क्रीडा संकुलात आंतराष्ट्रीय जलतरण केंद्र आहे, त्यामुळे ग्रामीण भागाला फायदा होईल.
- सुहास व्हनमाने, जिल्हा क्रीडा अधिकारी

दुसऱ्या टप्प्यात
- ऑलिंपिक आकाराचा जलतरण तलाव
- जिम्नॅशियम
- लॉन टेनिस दोन जागा
- बॅडमिंटन सहा कोर्ट
- टेबल टेनिस स्पर्धकांसाठी वसतिगृह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com