माता रमाईच्या स्मृतीस्थळावर लवकरच अष्टकोणी डोम
माता रमाईंच्या स्मृतिस्थळावर लवकरच अष्टकोनी डोम
कांदिवली (बातमीदार) : वरळी येथील माता रमाईंच्या स्मृतिस्थळावर पत्र्याच्या शेडऐवजी अष्टकोनी डोम बांधण्यात यावा, यासाठी
माजी मंत्री विजय गिरकर यांनी जी/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर यांची शुक्रवारी (ता. ४) भेट घेतली. आयुक्तांना सादर केलेल्या डोमच्या आराखड्यानुसार लवकरात लवकर काम सुरू करण्याचे आश्वासन क्षीरसागर यांनी दिले. याप्रसंगी मनपा सहाय्यक अभियंता राजेशकुमार यादव, मयूर देवळेकर, अमोल साळुंके, सिद्धार्थ खंडागळे, प्रकाश डोळस हे उपस्थित होते.
२७ मे १९३५ रोजी माता रमाई आंबेडकर यांचे निधन झाल्यावर वरळी स्मशानभूमी येथे माता रमाई यांच्या पार्थिवाचे दहन करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः उपस्थित होते. या स्मृतिस्थळावर साधे पत्र्याचे शेड असल्यामुळे ते काढून त्या ठिकाणी अष्टकोनी डोम बांधण्यात यावा. याकरिता विजय गिरकर अनेक वर्षे प्रयत्न करीत आहेत. यानुसार विजय गिरकर व मयूर देवळेकर यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन अष्टकोनी डोमचा आराखडा सादर केला होता. यानुसार महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या ठिकाणी अष्टकोनी डोम बांधण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे लवकरच वरळी येथील स्मृतिस्थळावर अष्टकोनी डोम उभारण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.