गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा
टोकावडे, ता. ६ (बातमीदार) ः मुरबाड तालुक्याचे माजी आमदार गोटीराम पवार यांच्या ७९व्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता. ९) गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात तालुक्यातील दहावी तसेच बारावीत शाळास्तरावर प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार होणार आहे.
अनेक वर्षांपासून मुरबाड तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक विविध जनसेवा प्रतिष्ठानतर्फे होत असतात. यात ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, विमा कवच योजना, रक्तदान शिबिर, कला व क्रीडा महोत्सव, युवक प्रेरणा अभियान अशा उपक्रमांचा समावेश असतो. या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना प्रोत्साहन मिळावे. तसेच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो. याच उद्देशातून गौरव सोहळ्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करण्यात येणार असून, त्यातून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.
---------------------------------------------
संपर्काचे आवाहन
तालुक्यातील एमबीबीएस, पीएचडी तसेच उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांनी आपली माहिती जनसेवा प्रतिष्ठान मुरबाड यांच्याकडे लवकरात लवकर नोंदवावी, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.