विठ्ठलाच्या जयघोषात वारीचा सोहळा

विठ्ठलाच्या जयघोषात वारीचा सोहळा

Published on

मुरबाड, ता.६ (बातमीदार)ः शहरातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यावतीने आषाढी एकादशी निमित्त ग्रंथदिंडी, पालखी सोहळा करण्यात आला. यावेळी संताच्या वेशभूषेतील वारकऱ्यांनी विठुरायाचा जयघोष केला.
न्यू इंग्लिश स्कूल ते राम मंदिर या मार्गावर विठुरायाचा जप करीत निघालेल्या दिंडीने शहरातील वातावरण भक्तीमय झाले. या पालखी सोहळ्यामध्ये विद्यार्थी, शिक्षकांनी वारकरी तसेच संतांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या, पालखीचे स्वागत विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टच्यावतीने हरेश पुरोहित तसेच श्रीराम मंदिर ट्रस्टच्या वतीने दिलीप भाऊ चोणकर यांनी केले. या सोहळ्यात मुरबाड तालुका दुय्यम शिक्षण संस्थेचे सचिव किसन चौधरी , संचालक भास्कर खंडागळे, प्राचार्य राकेश पाडवी, सीईओ निकम, उपप्राचार्य जयवंत कराळे, उप मुख्याध्यापक अनिल सोनवणे सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com