दिघोडे ची अवनी कोळी आंतरराष्ट्रीय तर
दिघोडेची कन्या आशियाई स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व
रायगड व नवी मुंबईतून संघात निवड झालेली प्रथम महिला
उरण, ता. ६ (वार्ताहर) ः दिघोडेची कन्या अवनी कोळी ही आशियाई स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. कझाकिस्तान येथे आशियाई शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी अवनी कोळी हिची निवड झाली आहे. तर भोपाळ येथील ६८व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जासई उरणचे नेमबाज कुणाल मलिकेश पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीने त्यांच्या जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अवनी कोळी हिने आजपर्यंत अनेक स्पर्धांमध्ये सुवर्ण, रौप्य, ब्रांझ, कांस्यपदके मिळवत यश संपादन केले आहे. नुकताच डेहराडून येथे झालेल्या स्पर्धेत तिने आपला दबदबा कायम ठेवत चमकदार कामगिरी केली होती. यानंतर आता तिची निवड १४ ऑगस्ट ते २८ ऑगस्ट रोजी कझाकिस्थान येथे होणाऱ्या आशियाई शुटिंग चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी झाली आहे. डबल ट्रॅप शॉटगन ज्युनिअर वुमन या नेमबाजीसाठी अवनी कोळी हिची भारतीय संघातर्फे निवड केली आहे. ती रायगड व नवी मुंबईतून भारतीय संघात निवड झालेली प्रथम महिला नेमबाज आहे.
या यशाबद्दल दिघोडे गावचे विद्यमान सरपंच कीर्तिनिधी ठाकूर तसेच मुसा मेहमूद काझी, साईम झुबेरखान देशमुख, अली रझा सय्यद, आयएमएस उलवेच्या मुख्याध्यापिका गौरी शाह यांनी विशेष कौतुक केले.
कुणाल पाटीलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
कुणाल पाटील यांनी ऑल इंडिया ओपन शूटिंग स्पर्धेत ५० मीटर रायफल प्रोन शूटिंग स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी केली होती. यानुसार त्याची ६८व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.