शिवमंदिर परिसरात रिंगण पाहण्यासाठी गर्दी
अंबरनाथ, ता. ६ (बातमीदार) : आषाढी एकादशीला अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर परिसर रामकृष्ण हरी आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमला. यानिमित्ताने उल्हासनगर कॅम्प पाचमधील विठ्ठल मंदिरातून दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंडी यात्रा निघाली होती. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘राम कृष्ण हरी’च्या जयघोषात पारंपरिक वारकरी पोशाखातील महिला, पुरुष, तसेच लहान मुलांनी दिंडीत सहभाग घेतला. उल्हासनगर शहरात जेवणाचे डबे वाहतूक करणाऱ्या बांधवांनी पंढरपूरला प्रत्यक्ष न जाता अंबरनाथच्या शिवमंदिरात वारीचा आनंदोत्सव अनुभवण्यासाठी काही वर्षांपासून ही परंपरा सुरू केली आहे. गायकवाड पाड्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून निघालेली दिंडी प्राचीन शिवमंदिरात दाखल झाली. या वेळी शिवमंदिरात रिंगण पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.