तुळशीच्या पानावर विठ्ठलाचे चित्र
तुळशीपत्रावर साकारला पांडुरंग
पनवेल, ता. ६ (बातमीदार) : ‘तुळशी वृंदावनात नांदती विठोबा माउली’ असे बोलले जाते. कळंबोलीतील १३ वर्षांचा बालचित्रकार नील कमलेश चौधरी याने हे बोल खरे करून दाखवले आहेत. आषाढी एकादशीनिमित्त त्याने तुळशीपत्रावर विठ्ठलाचे सूक्ष्म चित्र साकारले आहे.
नील याने केवळ चित्रकलेची आवड म्हणून नव्हे, तर विठूरायाप्रति असलेल्या श्रद्धेपोटी हे चित्र साकारले आहे. त्याच्या आगळ्यावेगळ्या सूक्ष्म कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रद्धा, संयम आणि कल्पकतेचा संगम असलेली ही कलाकृती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. लहान ब्रश, माफक रंगसाहित्याच्या आधारे ही कलाकृती साकारल्याचे नील सांगतो.
पंढरीचा राजा विठ्ठल म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचं प्रतीक. विठ्ठलाला तुळशीपत्राची आवड, तुळशीचे पान पवित्र मानले जाते. त्यामुळे त्यावर विठूरायाचे चित्र रंगवणे ही माझ्यासाठी एक आध्यात्मिक अनुभूती होती. यापूर्वीही मी धार्मिक आणि सांस्कृतिक विषयांवर चित्रे साकाली आहेत, मात्र यंदाची आषाढी एकादशी त्याच्यासाठी खास आणि अधिक भावपूर्ण आहे.
- नील चौधरी, चित्रकार, कळंबोली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.