शक्तिपीठाकडून गेले भक्तिपीठाकडे सायकल वरी,आषाढी वारी पंढरपुरी
सायकलवरी आषाढी वारी
भिवंडीतील भक्तगण पंढरपुरात पांडुरंगाच्या दर्शनाला
भिवंडी, ता. ६ (बातमीदार) : पर्यावरण रक्षणाचा संदेश देत प्रदूषणमुक्त प्रवासासाठी सायकल हा एक उत्तम पर्याय आहे. यानुसार पंढरपूर वारीच्या निमित्ताने भिवंडीतील सहा भक्तगण शक्तीपीठ छत्रपती शिवाजी महाराज मंदिर येथून श्री क्षेत्र पंढरपूर या भक्तिपीठाकडे आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनाला गेले आहेत. अशा अनोख्या दिंडी-वारीचे हे त्यांचे तिसरे वर्ष आहे.
‘आषाढी वारी, सायकल वरी’ असे ब्रीद घेऊन या अनोख्या सायकल प्रवासात कोनगावचे उपसरपंच विनोद हेंदर म्हात्रे, माजी सैनिक प्रवीण टावरे, शक्तिपीठ छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडीचे विश्वस्त प्रदीप पाटील, केबल नेटवर्कचे संजय पांचाळ, सायकलिस्ट दुर्गेश झिपरे व प्रथमेश मुंबारकर हे सहा सायकलस्वार सहभागी झाले. तीन दिवसांत शक्तिपीठ छत्रपती शिवाजी महाराज मंदिर ते श्री क्षेत्र पंढरपूर असे तब्बल ४०० किलोमीटरचे अंतर त्यांनी पूर्ण केले. श्री क्षेत्र पंढरपूरला वारीबरोबर वेळेअभावी चालत जाणे शक्य नसले तरी कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न करता सायकलने पंढरपूरला जाण्याचा सायकल वारकऱ्यांचा हा प्रयोग अल्पावधीत यशस्वी झाला असून, याचे तरुणांना आकर्षण आहे.
पर्यावरण रक्षणाचा संदेश
हे सहाही सायकलवीर पर्यावरण संतुलन राखणे तसेच नागरिकांनी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, असा प्रचार करीत आहेत. त्याचबरोबरच हे सायकलवीर प्रवासात रस्त्याकडेने झाडांच्या बिया टाकत जात आहेत. याशिवाय स्वच्छ भारत अभियान महत्त्व व जागतिक लोकसंख्या नियंत्रण याविषयीही प्रचार करण्याचा त्यांचा मानस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.