ठाकरे बंधू केवळ सत्तेसाठी एकत्र
ठाकरे बंधू केवळ सत्तेसाठी एकत्र
परिवहनमंत्री सरनाईक यांचे एकनाथ शिंदे यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ६ ः ‘ठाकरे बंधू केवळ सत्तेसाठी एकत्र आले असून एकनाथ शिंदे हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वैचारिक वारसदार असून मराठी आणि महाराष्ट्रासाठी झटणारे सच्चे नेते आहेत,’ अशा आशयाचे पत्र परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी (ता. ६) लिहिले आहे.
मुंबई येथील वरळी डोम येथे शनिवारी (ता. ५) झालेल्या मेळाव्यात ठाकरे बंधूंची पुढची वाटचाल एकत्र असले, असे संकेत देण्यात आले. या
पार्श्वभूमीवर शनिवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की ‘दाढीवरून अर्धा हात फिरवत २०२२ मध्ये आम्ही उठाव केला होता. तेव्हापासून ते आडवे झाले. त्यातून ते सावरले नाहीत, अजून आडवेच आहेत. आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे उठेगा नही, हे बोलणे त्यांना शोभत नाही. मनगटात जोर लागतो, फक्त तोंडाच्या वाफा सोडून होत नाही, अर्ध्या दाढीवरून हात फिरवला तर ही गत झाली, पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता तर काय झाले असते.’ दरम्यान, रविवारी (ता. ६) परिहनमंत्री प्रताप सरनाईक यांनीही एक पत्र प्रसिद्धीद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना एक भावनिक पत्र लिहीत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाची विजयी वाटचाल सुरू झाली असल्याचे नमूद केले. ‘मराठीची टोपी घालून अनेक वर्षे शिवसेना ठाकरे गटाने मुंबई महापालिकेची सत्ता उपभोगली; परंतु त्यांनी आजवर मुंबई आणि मराठी माणसांना टोपी घालण्याचेच काम केले. या टोपीखाली दडलंय काय तर केवळ स्वार्थ आणि अप्पलपोटेपणा,’ असे परिहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे.
..
मराठी माणूस आपल्यासोबत असल्याचा विश्वास
कोविड रुग्णांची खिचडी खाऊन गब्बर झालेली ही मंडळी मिठी नदीतील भ्रष्टाचाराच्या गाळात खोलवर अडकून पडली आहेत. मराठी भाषेचा कैवारी असल्याचा आव आणणाऱ्यांनी मराठीचे जेवढे नुकसान केले, मुंबई तोडण्याचा डाव असा अपप्रचार करून लोकांची मते लाटली. त्यामुळे पश्चात्ताप मेळावा घेऊन ठाकरे गटाने जनतेला माहिती दिली पाहिजे, असे सरनाईक यांनी पत्रात लिहिले आहे. या पत्रात प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्र व मराठी माणूस आपल्यासोबत असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देत पत्राचा समारोप केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.