मुंबईत रेल्वे गाड्यांचा नवा उच्चांक

मुंबईत रेल्वे गाड्यांचा नवा उच्चांक

Published on

मुंबईत रेल्वे गाड्यांचा नवा उच्चांक
वक्तशीर सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये मोठी वाढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने जून २०२५मध्ये प्रवासी सेवेच्या दृष्टीने महत्त्वाची कामगिरी बजावली असून, दररोज सरासरी २०१ मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे संचालन करण्यात आले. मागील वर्षी याच कालावधीत ही सरासरी १९३ होती. म्हणजेच यात दररोज आठ गाड्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जून महिन्यात एकूण ६,०३५ मेल/एक्स्प्रेस गाड्या धावल्या. यामध्ये ५,६१५ नियमित गाड्या आणि ४२० विशेष गाड्यांचा समावेश होता.
एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत विभागाने एकूण १६,८५३ मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे संचालन केले असून, त्यात १,३९० विशेष गाड्या होत्या. मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या १६,७०१ होती. उन्हाळी सुट्टीत प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेता, यंदा ५२६ विशेष गाड्या साेडण्यात आल्या. २०२४मध्ये ही संख्या ४४९ असून, यंदा १७ टक्क्यांची वाढ झाली आहे. गाड्यांच्या वाढत्या संख्येबरोबरच वेळेचे काटेकोर नियोजन आणि सेवा व्यवस्थापन अधिक सुगम होण्यासाठी विभागाचे प्रयत्न सुरूच आहेत. ही कामगिरी म्हणजे धोरणात्मक नियोजन, संघटित कार्यपद्धतीचा परिपाक असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गाड्यांच्या संख्येबरोबरच वक्तशीरपणातही सकारात्मक बदल दिसून आला आहे. एप्रिल ते जून २०२५ या कालावधीत मेल/एक्स्प्रेस गाड्यांचा वक्तशीरपणा ८६ टक्क्यांवर पोहोचला, जो आधीच्या तुलनेत उंचावलेला आहे. उपनगरीय लोकल गाड्यांचा अचूकता दर ९३ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात मेल/एक्स्प्रेस गाड्यांनी ८५ टक्के वेळेचे पालन केले, तर उपनगरीय सेवेने ९३ टक्क्यांचा अचूक वेळेचा दर कायम राखला.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com