तिलोरेतील शेतकऱ्याच्या मदतीला धावले मंत्री

तिलोरेतील शेतकऱ्याच्या मदतीला धावले मंत्री

Published on

तिलोरेतील शेतकऱ्याच्या मदतीला धावले मंत्री
मृत झालेल्या बैलजोडीबद्दल दिली तातडीची मदत
माणगाव, ता. ७ (बातमीदार) ः तालुक्यातील तिलोरे येथील शेतकरी संजय बेंदुगडे यांची बैलजोडी शेतामध्ये नांगरणीसाठी जात असताना विजेच्या खांबामधील विद्युत प्रवाहाच्या झटक्याने जागीच ठार झाल्याची घटना घडली. दरम्यान, मृत पावलेल्या या दोन बैलांचे फोटो सोशल मीडियावर पाहताच प्रत्येकाचे मन हेलावून गेले. या दुर्दैवी घटनेची माहिती मंत्री भरत गोगावले यांना मिळताच चोवीस तासांच्या आत संकटग्रस्‍त शेतकरी संजय बेंदुगडे यांच्या तिलोरे येथील निवासस्थानी भेट देत तातडीची मदत म्‍हणून रोख रक्‍कम दिली. तसेच महावितरणकडून नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
सध्या अनेक ठिकाणी नांगरणी तसेच शेतीची कामे सुरू आहेत. त्‍यामुळे तिलेरे येथील शेतकरी संजय बेंदुगडे हेदेखील आपल्या बैलजोडी समवेत शेतीच्या कामाला निघाले असता, महावितणच्या खांबातील विद्युत प्रवाहामुळे बैलांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रत्येकाचे मन हेलावून गेले. दरम्यान, या घटनेची माहिती मंत्री भरत गोगावले यांना समजली. त्‍यांनी तत्‍काळ शेतकरी संजय बेंदुगडे यांची भेट घेऊन त्‍यांना धीर दिला. तसेच तातडीची मदत म्‍हणून रोख रक्कम २५ हजार रुपये दिले. तसेच जागेवरच महाविरणच्या अधिकारीवर्गाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच तत्‍काळ सर्व प्रक्रिया पूर्ण करून संबंधित शेतकरी कुटुंबाला नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी सूचना केली. या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे, शिवसेना माणगाव तालुकाप्रमुख ॲड. महेंद्र मानकर, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नीलेश थोरे, विभागप्रमुख योगेश बक्कम, खरवली सरपंच संतोष खडतर, शाखाप्रमुख शैलेश जंगम, युवासेना विभागप्रमुख सुरज सांगले, आप्पा सांगले, अमित ढाकवळ, अनिल बेंदुगडे व तिलोरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com