चार दिवसांपासून वोडाफोन मोबाईल नेटवर्क गायब

चार दिवसांपासून वोडाफोन मोबाईल नेटवर्क गायब

Published on

चार दिवसांपासून वोडाफोनचे नेटवर्क गायब
नागरिकांना नाहक मनस्तापः आर्थिक व्यवहार ठप्प
जव्हार, ता. ७ (बातमीदार) ः देशात डिजिटल इंडियाच्या माध्यमातून सर्व कामे ही इंटरनेटच्या माध्यमातून होत आहेत, मात्र गेल्या चार दिवसांपासून जव्हार शहर तथा ग्रामीण भागात वोडाफोनचे नेटवर्क गायब झाले आहे. यामुळे अनेकांची कामे खोळंबली असून, नागरिकांना नाहक मनस्ताप होत आहे.
खरीप हंगाम आणि शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने शेतकरी आणि विद्यार्थी अनेक कामे ही इंटरनेटच्या माध्यमातून करतात, मात्र सततचा खंडित विद्युतपुरवठा, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या असतानाच आता फोनद्वारे संपर्कदेखील होत नसल्याने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत. दरम्यान, महिन्याचा एवढा महाग रिचार्ज करूनदेखील मोबाईल सेवा ग्राहकांना देण्यात वोडाफोन कंपनी सपशेल फेल झाली आहे, ग्राहकांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून दूर ठेवले जात आहे, असे पडसाद उमटत आहेत.
सध्या जव्हार तालुक्यात मोबाईलच्या माध्यमातून वीजबिल, फोनबिल, नळपट्टी, घरपट्टी, बाजार सामान वस्तू खरेदी, विद्यार्थी शुल्क, रुग्णालय उपचार शुल्क असे नाना प्रकारचे व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून करण्याच येतात, मात्र वोडाफोन मोबाईल कंपनीने ग्राहकांची सुविधा बंद केल्याने येथील आर्थिक व्यवहार ठप्प पडले आहेत.
गेल्या चार दिवसांपासून वोडाफोन कंपनीचे मोबाईल नेटवर्क बंद आहे, याबाबत डिस्ट्रिब्युटरशी संपर्क होत नाही. शिवाय मोबाईल नेटवर्क कंपनीचादेखील संपर्क होत नाही. त्यामुळे ही विस्कळित सेवा नेमकी कशी सुरू होईल, हाच प्रश्न आहे. यामुळे ग्राहकांना मनस्ताप होत आहे.
- रवींद्र गवते, वोडाफोन ग्राहक

वोडाफोन कंपनीच्या मोबाईलला नेटवर्क नसल्याचं नागरिकांनी कळविले. त्यानुसार संबंधित डिस्ट्रिब्युटर अगर किंवा कंपनीला ही बाब सुरळीत करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.
- लता धोत्रे, तहसीलदार, जव्हार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com