घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद

घरफोडी करणारा सराईत चोरटा जेरबंद

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये दिवसाढवळ्या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील घरे फोडणारे डोंबिवली पूर्व येथील रोशन जाधव (३४) या सराईत चोरट्यास ठाणे शहर पोलिसांच्या उल्हासनगर गुन्हे शाखेच्या घटक ४ ने अटक केली. त्याच्याकडून आठ गुन्ह्यांमधील १९ लाख ८१ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती ठाणे शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी सोमवारी (ता. ७) ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात बदलापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (ता. १) घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास उल्हासनगर गुन्हे शाखा घटक-४ मार्फत सुरू होता. पोलिस हवालदार गणेश गावडे यांना तांत्रिक तपासाच्या आधारे व गुप्त बातमीदाराकडून गुन्ह्यातील संशयित रोशन जाधव हा उल्हास नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर उल्हासनगर-१ येथील बंद अमरडाय कंपनीजवळ फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यामधील १८,९१७ ग्रॅम वजनाचे १५ लाख १३ हजार ३६० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, १० हजारांची चांदीचे दागिने, ८० हजारांचे दोन लॅपटॉप, ५० हजारांचे दोन मोबाइल आणि गुन्ह्यात चोरी गेलेल्या रकमेपैकी तीन लाख २८ हजारांची रोख रक्कम असा एकूण १९ लाख ८१हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यामध्ये सात बदलापूर पूर्व आणि पश्चिम; तसेच एक शिवाजीनगर अशा आठ पोलिस ठाण्यातील गुन्हे आहेत. पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलिस आयुक्त (शोध-१) शेखर बागडे आदी पोलिस अधिकारी उपस्थित होते. ही कारवाई उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीरंग गोसावी, पोलिस हवालदार गणेश गावडे, राजेंद्र थोरवे, योगेश वाघ, चंद्रकांत सावंत, रितेश वंजारी, मंगेश जाधव, पोलिस नाईक कुसूम शिंदे, विक्रम जाधव, पोलिस शिपाई संजय शेरमाळे, अशोक थोरवे, प्रसाद तोंडलीकर, रेवणनाथ शेकडे, रामदास उगले यांनी केलेली आहे.
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com