अखेर दहशत निर्माण करणारा नशेखोर जेरबंद

अखेर दहशत निर्माण करणारा नशेखोर जेरबंद

Published on

उल्हासनगर, ता. ७ (बातमीदार) : दहशत निर्माण करून थोरात कुटुंबीयांचे जगणे कठीण करणारा नशेखोर श्याम बनकर या तरुणाला विठ्ठलवाडी पोलिसांनी कोयत्यासह जेरबंद केले आहे.
कायद्याने वागा लोकचळवळीचे राज असरोंडकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील पाटील, मनसेचे कल्याण जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते शिवाजी रगडे, ॲड. स्मिता नितनवरे, कायद्याने वागाचे मीडिया समन्वयक प्रफुल केदारे या शिष्टमंडळासोबत थोरात कुटुंबीयांनासोबत घेऊन या नशेखोरावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांची भेट घेतली होती. कोम्बिंग ऑपरेशन राबवून नशेखोराची माहिती कळवण्याकरिता टोल-फ्री आणि व्हॉट्सॲप क्रमांक नागरिकांसाठी उपलब्ध करणार आहे. हे क्रमांक माझ्याशी जोडलेले असल्याने माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार, असे आश्वासन गोरे यांनी दिले होते. त्यानंतर विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षल कुलकर्णी व पथकाने श्यामला सोंग्याची वाडी, भरतनगर येथून कोयत्यासह जेरबंद केले. याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com