जेईई-नीटमधील यशाचा उत्सव

जेईई-नीटमधील यशाचा उत्सव

Published on

एलन मुंबईने साजरा केला जेईई-नीटमधील यशाचा उत्सव
टॉपर्सचा गौरव करण्यात आला
मुंबई, ता. ७ ः जेईई-ॲडव्हान्स्ड आणि नीट-यूजी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर एलन मुंबईच्या वतीने यशाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. विविध प्रवेश परीक्षांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एलन मुंबईच्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचीही उपस्थिती होती. हा कार्यक्रम ठाणे पश्चिम येथील तीन हात नाका, टिप-टॉप प्लाझामध्ये पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून एलन करिअर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष विनोद कुमावत, उपाध्यक्ष आणि झोनल हेड आशुतोष हिसारिया आणि एलन मुंबई केंद्राचे प्रमुख प्रशांत भट्ट उपस्थित होते. या वेळी एलन मुंबईचे प्राध्यापक आणि स्टाफ सदस्यही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात उपाध्यक्ष आशुतोष हिसारिया आणि केंद्रप्रमुख प्रशांत भट्ट यांनी एलन मुंबईच्या यशाबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी अध्यक्ष विनोद कुमावत म्हणाले, विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी एलन नेहमीच प्रयत्नशील असते. उत्तम शिक्षक, उत्तम सुविधा आणि दर्जेदार स्पर्धा देणे हाच आमचा उद्देश असतो. त्यामुळे विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करतात आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत घेतात. फक्त डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्यापुरतेच आपले स्वप्न मर्यादित ठेवू नका, तर एक चांगला माणूस आणि जबाबदार नागरिक होण्याचाही विचार करा. चांगले इंजिनिअर आणि डॉक्टर बनून देशासाठी आणि समाजासाठी कसे योगदान देता येईल, याकडेही लक्ष द्या.
उपाध्यक्ष आशुतोष हिसारिया म्हणाले की, एलन मुंबई सातत्याने उत्तम निकाल देत आहे. एलनचे प्रत्येक निर्णय हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी असतात. ३७ वर्षांचा व्यापक अनुभव आणि उत्कृष्ट शैक्षणिक टीमसह एलन विद्यार्थ्यांना सर्वोत्तम वातावरण देण्यासाठी वचनबद्ध आहे.
एलन मुंबई केंद्राचे प्रमुख प्रशांत भट्ट म्हणाले की, एलनची नेहमीच हीच प्रयत्न असतो की प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न पूर्ण व्हावे. त्यासाठी त्यांना सर्व प्रकारचा आधार दिला जातो. वर्षानुवर्षी येणारे यशस्वी निकाल एलन मुंबईच्या उत्कृष्ट प्रणालीचा पुरावा आहेत.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. विद्यार्थी आपल्या पालकांसोबत स्टेजवर आनंदाने आणि अभिमानाने पोहोचले. स्टेजवर सतत गीतांची धून सुरू होती आणि विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले, ज्यामुळे वातावरण अधिक उत्साही झाले. या ‘विक्टरी सेलिब्रेशन’मध्ये जेईई-ॲडव्हान्स आणि नीट यूजी परीक्षांमध्ये टॉप करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सरस्वतीपदक’ व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

हे होते टॉपर्स
जेईई-ॲडव्हान्स २०२५: भविष्य मोटवानी (एआयआर ७३), बिपुलकुमार (एआयआर १०९), श्रेष्ठ अ- ई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com