दादडे केंद्र शाळेमध्ये नववीच्या वर्गाचे उद्‍घाटन

दादडे केंद्र शाळेमध्ये नववीच्या वर्गाचे उद्‍घाटन

Published on

विक्रमगड (बातमीदार) : दादडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च केंद्रशाळेतील नववीच्या वर्गाचे उद्‍घाटन मोठ्या उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी चेतन वाडीले, विस्तार शिक्षणाधिकारी प्रभू पाचमासे, केंद्रप्रमुख किरण रोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेश कासट, सरपंच ज्योत्स्ना भोये, उपसरपंच भरत ठाकरे, लवेश कासट, प्रवीण भावर, काशिराम कासट, सागर जोघारी, शाळेचे मुख्याध्यापक शशी तारवी, पालक वर्ग, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----
मॅड फाउंडेशनकडून विद्यार्थ्यांसाठी मल्लखांब
विक्रमगड (बातमीदार) : मॅड फॉउंडेशन येथील वसतिगृहामध्ये १२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना व अन्य शाळांच्या विद्यार्थ्यांना रोबोटिक्स फुटबॉल व मल्लखांब याचा लाभ मिळावा, या दृष्टिकोनातून रोबोटिक्स फुटबॉल व मल्लखांब यांचा मॅड फाउंडेशन व इन्फॉर्म मार्केट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरुवात करण्यात आली. भावेश वोरा यांच्याकडून मल्लखांब देण्यात आले. विश्वास पार्टे, पायल जैन, सलीम काझी, मॅड फाउंडेशनचे पदाधिकारी हरेशभाई शाह, परागभाई मेहता, मनीषभाई मेहता, विक्रमगड हायस्कूलचे मुख्याध्यापक नाना खरपडे, रमेश भोईर, नरेश मराड, समीर आळशी, देवेंद्र ठाकरे उपस्थित होते.
----
आईच्या स्मृतिदिनी ७५ आंब्याच्या रोपांचे वितरण
कासा (बातमीदार) : चरी, कोडबी, नरपड जुन्नर पाडा या गावांमध्ये पर्यावरण संवर्धनासाठी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. एक झाड आईच्या नावाने या उपक्रमांतर्गत सुलोचना मन्ना स्वामी यांच्या स्मृतिदिनी ७५ आंब्याच्या रोपांचे वितरण करण्यात आले. वन विभागात कार्यरत असलेले तिलक स्वामी यांनी आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम आयोजित केला. त्यांच्या आई कैलास वर्सेस सुलोचना मन्ना स्वामी यांचे २१ मे रोजी निधन झाले होते. तिलक स्वामी यांनी या वेळी इतर सर्व औपचारिक कार्यक्रमांना फाटा देत केवळ आईच्या स्मृतीसाठी निसर्ग संवर्धनाला वाहिलेली ही अभिनव संकल्पना साकारली. त्यांनी आंब्याच्या विविध जातींची ७५ कलमे स्थानिक ग्रामस्थांना वाटप केली.
----
जव्हार पोलिसांकरिता आरोग्य शिबिर
जव्हार (बातमीदार) : दिवस आणि रात्र एकत्र करत २४ तास सेवा बजावून जव्हार तालुक्यातील नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्थेद्वारे संरक्षण देणाऱ्या जव्हार पोलिसांकरिता जव्हार पोलिस ठाणे येथे धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर यांच्या विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात सहा अधिकारी आणि ४१ कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. या आरोग्य तपासणी शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रबोधनात्मक मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमासाठी पोलिस निरीक्षक विजय मुतडक व त्यांचे सहकारी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. वेदांत हॉस्पिटलचे सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक डॉ. मुकुंद खंडेलवाल आणि त्यांच्या पथकाने या उपक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
----
शेतकरी कुटुंबांना फळझाडांचे वाटप
मनोर (बातमीदार) : शिवा एनजीओ आणि येस फाउंडेशनमार्फत सावरे गावातील पवार पाड्यातील शेतकरी कुटुंबांना फळझाडांचे वाटप करण्यात आले. पवार पाड्यातील प्रत्येक कुटुंबाला रविवारी (ता. ६) आयोजित छोटेखानी कार्यक्रमात केसर आंब्याची पाच रोपे वाटप करण्यात आली.
----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com