पनवेल प्‍लॅस्‍टिकच्या विळख्यात

पनवेल प्‍लॅस्‍टिकच्या विळख्यात

Published on

ग्रीन व्हॅली वॉकर्स असोसिएशनतर्फे बांबूलागवड
पर्यावरण संरक्षणासाठी बांबूलागवड महत्त्वाची
नवी मुंबई, ता. ८ (वार्ताहर) : ग्रीन व्हॅली वॉकर्स असोसिएशन व सँडोज फार्मास्युटिकल कंपनीच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर सेक्टर-९ येथील ग्रीन व्हॅली येथे रविवारी १०० बाबूंची लागवड करण्यात आली. सीएसआर फंडाच्या विनियोगातून पर्यावरण संवर्धनाला प्रोत्साहन देणे आणि कार्बन फूटप्रिंट कमी करणे हा बांबूलागवडीमागील उद्देश असल्याचे संदीप शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डी. बी. पाटील, सॅन्डोज कंपनीचे प्रतिनिधी प्रसन्न शेलार, संदीप शिंदे, सजग नागरिक मंचाचे संघटक सुधीर दाणी व ग्रीन व्हॅली वॉकर्स असोसिएशनचे सदस्य भक्ती कंबलचा व अन्य सदस्य उपस्थित होते.
बांबू ही अतिशय वेगाने वाढणारी पर्यावरणपूरक वनस्पती आहे. बांबू कार्बन डायऑक्साइड मोठ्या प्रमाणात शोषून घेतो आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन तयार करतो. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने बांबूलागवड उपयुक्त ठरत असल्याने त्यास प्राध्यान्य दिले गेले पाहिजे. बांबूलागवडीतून सँडोजने पर्यावरणप्रती आपली कटिबद्धता स्पष्ट केल्याचे सुधीर दाणी या वेळी म्हणाले. त्याचबरोबर बांबूच्या मुळांची पकड खोलवर असल्यामुळे तो मातीची धूप रोखतो. डोंगर उतारांवर, नदी-नाल्यांच्या काठावर बांबूची लागवड केल्यास मृदा संरक्षणात मदत होते. बांबूलागवड ही केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही लाभदायक असून, शाश्वत विकासासाठी एक महत्त्वाचा पर्याय आहे, असे प्रदूषण मंडळाचे अधिकारी डी. बी. पाटील यांनी सांगितले. आगामी काळात याच ठिकाणी वड, पिंपळ, कडुनिंब अशा देशी वृक्षांचीदेखील लागवड ग्रीन व्हॅली वॉकर्स असोसिएशनद्वारा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com