‘एचपी’चे नेक्स्ट-जेन ‘एआय’ लॅपटॉप लॉन्च

‘एचपी’चे नेक्स्ट-जेन ‘एआय’ लॅपटॉप लॉन्च

Published on

‘एचपी’चे नेक्स्ट-जेन ‘एआय’ लॅपटॉप लॉन्च
नवी दिल्ली, ता. ७ : एचपीने भारतात आपल्या ‘नेक्स्ट-जेन एआय’ लॅपटॉपची नवी श्रेणी सादर केली. या बजेट फ्रेंडली विचार करणाऱ्या वापरकर्त्यांना पॉवरफुल एआय क्षमतेचा लाभ मिळावा, यासाठी नवी एचपी ओम्नीबुक ५ आणि ३ सीरिजची निर्मिती करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले.

ओम्नीबुक ५ मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एक्स प्लस प्रोसेसर तर ओम्नीबुक ३ मध्ये एएमडी रायझेन एआय ३०० सीरिजचे प्रोसेसर देण्यात आले आहेत. या संपूर्ण सीरिजमध्ये स्वतंत्र न्यूरल प्रोसेसिंग युनिट (एनपीयू) आहे, जे ४५ ते ५० ट्रिलियन ऑपरेशन्स प्रति सेकंद (टीओपीएस) प्रक्रिया करण्यास सक्षम असून एचपी ओम्नीबुक ५ मध्ये जगातील सर्वात दीर्घकाळ टिकणारी बॅटरी (अंदाजे ३४ तासांपर्यंत) असल्याचा दावा कंपनीने केला आहे. एचपी इंडियाच्या पर्सनल सिस्टिम्स विभागाचे वरिष्ठ संचालक विनीत गेहानी यांनी सांगितले, की ‘आमच्या नव्या एचपी ओम्नीबुक नेक्स्ट-जेन एआय लॅपटॉपच्या लॉन्चसह, आम्ही एआय तंत्रज्ञान अधिकाधिक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देत आहोत. या नव्या श्रेणीच्या माध्यमातून इंटेलिजंट फीचर्स, दमदार परफॉर्मन्स आणि विचारपूर्वक केलेले डिझाइन परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. इनोव्हेशनमध्ये अग्रस्थानी राहतानाच भारतातील विद्यार्थ्यांपासून ते प्रोफेशनल्स आणि दररोज वापर करणारे वापरकर्ते यांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्याची आमची वचनबद्धता यातून दिसते.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com