त्रिभाषेसाठी नेमलेली समिती रद्द करा!

त्रिभाषेसाठी नेमलेली समिती रद्द करा!

Published on

त्रिभाषेसाठी नेमलेली समिती रद्द करा!

आझाद मैदानात कृती समितीचे आंदोलन

मुंबई, ता. ७ : शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून त्रिभाषा सूत्रासंदर्भातील शासन निर्णय रद्द केल्यानंतर राज्य सरकारने माजी कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली होती. याविरोधात सोमवारी (ता. ७) आझाद मैदानात प्रा. दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीने आंदोलन केले. या वेळी जाधव समिती त्वरित रद्द करा, तिसरी भाषा पहिली ते पाचवीपर्यंत लागू केली जाणार नाही, याचा नव्याने शासन आदेश काढावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, खासदार वर्षा गायकवाड, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, शैलेंद्र कांबळे, मुक्ता दाभोळकर, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यासह विविध समाजवादी, पुरोगामी संघटनांच्या प्रतिनिधींनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सकपाळ म्हणाले, ‘मराठी ही ज्ञानभाषा होऊ नये, यासाठी जो वर्ग आग्रही होता, तोच वर्ग हिंदी आणि त्यातून हिंदुत्व लादण्याचा प्रयत्न करीत आहे. हिंदीचा शासन निर्णय रद्द झाला असला तरी खरी लढाई आता सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील मराठी धर्म, मराठी संस्कृती वाचविण्यासाठी आता लढण्याची गरज आहे.’ मराठीची अस्मिता जपण्यासाठी मराठी शाळा आणि त्यांची स्थिती, त्यामध्ये किती मुले हिंदी शिकतात, किती शाळा बंद पडत आहेत, किती मुलांना शिक्षण मिळत नाही, याचा लेखाजोखा तयार करण्यासाठी एक व्यापक भूमिका ठरवण्याची गरज व्यक्त करून डॉ. जाधव समिती रद्द करण्याच्या मागणीला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. दरम्यान, दिवसभरातील आंदोलनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मराठी भाषा, संस्कृती आणि सरकारच्या हिंदीसंदर्भातील भूमिकेवर कडाडून टीका केली.
----
समितीच्या इतर मागण्या
- शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार यांनी राजीनामा द्यावा.
- शालेय शिक्षणात एनसीईआरटीची पुस्तके बंधनकारक केली जाऊ नयेत.
- सध्या पहिलीपासून इंग्रजीच्या धोरणात बदल करून ही भाषाही तिसरीपासून शिकवली जावी.
- राज्यात हिंदीच्या वापरासंदर्भात वस्तुस्थ‍िती सांगणारी श्वेतपत्रिका काढावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com