फडके विद्यालयात भक्ती, पारंपरिकतेचा संगम
फडके विद्यालयात भक्ती, पारंपरिकतेचा संगम
नवीन पनवेल, वार्ताहर ः येथील म. ए. सो. संस्थेच्या फडके विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमातील प्राथमिक विभागातर्फे आषाढी एकादशी श्रद्धा, भक्तिभाव आणि आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात टाळ-मृदंगाच्या गजरात आळंदी ते पंढरपूर वारीचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारी दिंडी मिरवणूक सादर केली. हातात भगवे झेंडे, मुखी ज्ञानोबा-तुकारामाचा गजर यामुळे विद्यालयाचा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. कार्यक्रमात पावली (टाळ) सादर करत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वारीचे दर्शन घडवले. यानंतर विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या गाण्यांवर अद्वितीय नृत्य सादरीकरण आणि विविध विठ्ठलगीतांचे सुमधुर मॅशअप सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विशेष म्हणजे, या उत्सवात विद्यार्थ्यांचे आजी-आजोबा तसेच पालक प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. त्यांनी शाळेच्या सांस्कृतिक व पारंपरिक उपक्रमांचे कौतुक केले. याप्रसंगी पालकांनी आवर्जून सांगितले की, शाळा मुलांमध्ये भारतीय संस्कृती, भक्तिभाव आणि नैतिक मूल्ये रुजविण्याचे अतिशय स्तुत्य कार्य करत आहे.
............
आषाढी एकादशी बांठिया विद्यालयात साजरी
नवीन पनवेल : आषाढी एकादशीनिमित्त नवीन पनवेल येथील बांठिया महाविद्यालयात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. श्रद्धा, भक्तिभाव आणि आनंदमय वातावरणात एकादशी साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाखात टाळ-मृदंगाच्या गजरात आळंदी ते पंढरपूर वारीचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारी दिंडी मिरवणूक सादर केली. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य बी. एस. माळी, उपमुख्याध्यापक ए. डी. आंब्रे, पर्यवेक्षक बी. यु. महाजन, पर्यवेक्षिका एस. आर. वेलणकर, तसेच ज्योती भामरे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी विठ्ठल नामाच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.