६४ प्रकल्पबाधितांना घराची चावी

६४ प्रकल्पबाधितांना घराची चावी

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ७ ः मालाड येथील शंकरवाडी रस्ता रुंदीकरणात ६४ प्रकल्पबाधितांना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री तसेच उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांनी घराच्या चाव्यांचे वाटप केले. या वेळी प्रकल्पबाधितांना घरे दिली जात असताना मोकळ्या जागेवर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.
मालाड पश्चिम येथील शंकर लेन (मिसिंग लिंक) रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित झालेल्या रहिवाशांना पर्यायी पुनर्वसनअंतर्गत पीएपी सदनिका वितरण कार्यक्रम महापालिकेच्या पी उत्तर विभाग कार्यालयात सोमवारी पार पडला. या वेळी शंकरवाडी रस्ता ५५० मीटर लांब आणि १८.३० मीटर रुंद रस्त्याच्या रुंदीकरणात प्रकल्पबाधित ६४ कुटुंबांना चावीवाटप करण्यात आले. या प्रकल्पात ३५७ बांधकामे हटवण्यात येणार आहेत. उत्तर मुंबईतील झोपडीधारकांना विभागात सुसज्ज घर मिळाले पाहिजे. तीन टप्प्यात होणाऱ्या या रस्त्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गाला जाणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. तसेच या भागात पाणी तुंबण्याची समस्याही निर्माण होणार नाही, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.

एकत्रित कामे करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
या प्रकल्पाचे तीन टप्प्यात होणारे काम एकामागोमाग एकाचवेळी पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना करून गोयल यांनी सध्या सुरू असलेल्या रस्त्यांचे काम अनेक ठिकाणी अर्धवट असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी रस्ते स्वच्छ नाहीत, तर काही ठिकाणी सपाटीकरण झाले नसल्याकडे त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.

स्वयंपूर्ण पुनर्विकास करा
आमदार प्रवीण दरेकर यांच्या इमारतींचा स्वयंपुनर्विकास करण्याच्या योजनेनुसार उत्तर मुंबईतील रहिवाशांनी त्यादृष्टीने इमारतीचा स्वतःच पुनर्विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यात बिल्डर अडथळे आणत असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही गोयल यांनी दिला. मालवणी परिसरात पुन्हा अनधिकृत बांधकामे उभी राहणार नाहीत, यावरही करडी नजर ठेवण्याचे निर्देश त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com