पॉलिटेक्निकचे १.४० लाख प्रवेश निश्‍चित

पॉलिटेक्निकचे १.४० लाख प्रवेश निश्‍चित

Published on

पॉलिटेक्निकचे १.४० लाख प्रवेश निश्‍चित
गुणवत्ता यादी जाहीर; दहावीत १०० टक्के गुण मिळवलेले पाच विद्यार्थी
मुंबई, ता. ७ : तंत्रशिक्षण संचालनालयांच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक)च्या प्रवेशाची आज अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. यात राज्यातील विविध महाविद्यालयांत एक लाख ४० हजार ८५० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांनी दिली.

अंतिम गुणवत्ता यादीत दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेल्या पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यासोबत ९० ते ९६ टक्के गुण मिळवलेल्या तब्बल नऊ हजार १५८ विद्यार्थ्यांचा आणि ९६ ते ९९ टक्के गुण मिळवलेल्या ५२८ विद्यार्थ्यांनाही पॉलिटेक्निक प्रवेशाला पसंती दर्शवली आहे. यात मुलांची संख्या ९० हजार ७०१ तर मुलींची संख्या केवळ ५० हजार ५९ इतकी आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाचे ५ जूनला या प्रवेशाची तात्पुरती यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली असून यात एक लाख ४० हजार ८५० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. यात राज्यासह इतर राज्यातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. या यादीत विविध तांत्रिक कारणांमुळे अथवा एकाहून अधिक अर्ज केलेल्यांपैकी ४१९ जणांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.
-----
आजपासून पसंतीक्रम
अंतिम गुणवत्ता यादीनंतर विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयांत पसंतीक्रम भरणे व निश्चित करणे, यासाठी ८ ते १० जुलैदरम्यानचा कालावधी दिला जाईल. तसेच पहिल्या फेरीच्या जागांचे वाटप हे १२ जुलैला झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांत शुल्क भरून १३ ते १५ जुलैदरम्यान प्रवेश घेता येतील.
--
दहावीतील टक्केवारीनुसार संख्या
टक्के - मुले - मुली
९६-९९ - १५६ - ३७२
९०-९५ - ३,५६८ - ५,५९०
८५-८९ - ७,८१९ - ८,५७४
८०-८४ - ११,१४९ - ९,१९८
७०-७४ - १२,९०० - ६,३९५
६५-६९ - १२,०७६ - ४,६१०
६०-६४ - ११,५०१ - ३,५६०
५५-५९ - ७,०९४ - १,६९८
५०-५४ - ५,७५४ - १,१४७
४५-४९ - ३,६७५ - ५८०
४०-४४ - १,९५९ - २७०
३५-३९ - ५८१ - ७३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com