उल्हासनगरात फिल्मी स्टाईल लूट
उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : शहरात भररस्त्यात दुचाकीस्वाराचा पाठलाग करत अनोळखी व्यक्तीने थेट चाकूचा धाक दाखवत त्याच्याकडून हजारोंची रोकड हिसकावली होती. ही घटना ‘फिल्मी स्टाईल’ने घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, उल्हासनगर पोलिसांनी १०० सीसीटीव्ही फुटेज तपासून काही दिवसांत तपासाचा माग काढत एक आरोपी गजाआड केला असून, दुसऱ्याचा शोध सुरू आहे.
रवी लालचंद वाटवानी (वय ४०) हे २८ जूनला सायंकाळी दुचाकीवरून कल्याण-मुरबाड रोडने जात होते. यावेळी अजमेरा कन्स्ट्रक्शन, सेन्च्युरी रेयॉनच्या संरक्षक भिंतीजवळ एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या दुचाकीवर मागे बसला. रवीभाई, मेरे को आगे छोड़ दो, मैं आपको पहचानता हूं, असे सांगत त्याने वाटवानी यांच्यावर ओळखीचा दाखला देत दबाव आणला. मात्र, वाटवानी यांनी ‘पुढे वाहतूक कोंडी आहे, मी पुढे जात नाही’, असे स्पष्टपणे सांगितल्यावर त्याने चाकू लावत धमकी दिली, ‘तुमको एक लड़का और एक लड़की है, मेरे को तेरे बारे में सब मालूम है,’ असे बोलून त्यांना घाबरवले. तसेच दुचाकी मुरबाडकडे वळवायला लावली. जीवनगंगाजवळील रस्त्याच्या कडेला ट्रकच्या आडोशाला नेऊन थांबवत दुसऱ्या साथीदाराच्या मदतीने त्यांच्याजवळील पैशांची पिशवी हिसकावून घेतली आणि ते दोघे काळ्या रंगाच्या स्कूटरवरून महारळ गावाच्या दिशेने पळून गेले. याप्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १०० सीसीटीव्ही तपासण्यात आले. तपासाअंती सूरज परघणे (वय २६) याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून हुडी, मोबाईल आणि २१ हजार ५०० रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे. दरम्यान, त्याचा साथीदार अवि घोरपडे अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या कारवाईसाठी अपर पोलिस आयुक्त संजय जाधव (पूर्व विभाग), परिमंडळ-४ चे उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलिस आयुक्त अमोल कोळी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे आणि गुन्हे पोलिस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. तपास पथकात पोलिस उपनिरीक्षक मोहन श्रीवास, जावेद मुलानी, सिद्धार्थ गायकवाड, भूषण खैरनार, अविनाश जाधव, सुशील पाटील, संदीप सोनवणे आणि संदीप शेकडे यांचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.