कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन
पनवेल, ता. ८ (बातमीदार) ः पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डासांचे प्रमाण वाढते. त्यामुळे हिवताप, डेंगी, मलेरिया यासारख्या साथजन्य रोग पसरण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत कीटकजन्य आजराविषयी खबरदारी घेण्यासाठी वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. महापालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करून नागरिकांनी पुरेशी खबरदावी घ्यावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी केले आहे.
सध्या महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने ‘हिवताप प्रतिरोध महिना’ साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत शाळा, गृह संकुले, आरोग्य केंद्राच्या आसपासचा परिसर, बाजारपेठांमध्ये हिवतापाची लक्षणे, उपचार व हिवताप प्रतिरोधअंतर्गत विविध उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे. पावसाळ्यात विविध कीटकजन्य रोगाचे प्रमाण वाढत असते. अशा वेळी नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून प्यावे. तसेच भाज्या, फळे इत्यादी वस्तू स्वच्छ धुवून मगच खाण्यासाठी वापराव्यात. सर्व केरकचरा घंटा गाडीतच टाकावा. घर व सभोवतालचा परिसर जास्तीत जास्त स्वच्छ ठेवावा. आपल्या इमारतीतील पाण्याची टाकी निर्जंतुक करावी. साचलेले पाणी, डबकी यातील पाणी वाहून जाईल, अशी सोय करावी, जेणेकरून डास उत्पन्न होणार नाहीत. शिळे व उघड्यावरचे अन्न खाऊ नये, विहिरीचे पाणी शुद्धीकरण करूनच पिण्यास वापरावे. अतिसार झाल्यास क्षार संजिवनी मिश्रणाचा वापर करावा. घरांतर्गत डास उत्पत्तीस्थाने टाळण्यासाठी घरातील फुलदाणी मनीप्लँट, वॉटरकूलर इत्यादीमधील पाणी आठवड्यातून एक दिवस पूर्णपणे काढून कोरडे करून ‘कोरडा दिवस’ पाळणे, अशा सूचना वैद्यकीय आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी केले आहे.
................
जेवणापूर्वी व शौचास जाऊन आल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुणे, पूर्ण शिजवलेले, ताजे अन्न खावे, रस्त्यांवरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नयेत. ताप सर्दी, खोकला अशा प्रकारची लक्षणे असल्यास नजीकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. हिवताप, डेंगी, मेंदूज्वर, चिकुनगुनिया, मलेरिया असे साथीचे रुग्ण आपल्या आसपास आढळल्यास जवळच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी किंवा रुग्णालयाशी संपर्क साधावा. रुग्णालयांनी, प्रयोगशाळांनी साथीच्या रोगाचे रुग्ण महापालिकेला idsppanvelcorporation@gmail.com या ई-मेल आयडीवरती कळवावे, असे आवाहन वैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.