मुंबई
पालिका शाळांमध्ये साक्षरता दिंडी
भिवंडी (वार्ताहर)ः महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये साक्षरता दिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी रुक्मिणीमातेचे पात्र साकारले. तसेच वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी होताना साक्षरतेचा संदेश दिला. वारीच्या माध्यमातून ‘नवभारत साक्षरता’ कार्यक्रमाचा प्रचार व प्रसार करण्यात आला. विविध घोषवाक्य, फलक, पोवाडे आणि भजनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर, अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त बाळकृष्ण क्षीरसागर, सहाय्यक आयुक्त अजित महाडिक, शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी सौदागर शिखरे यांनी कौतुक केले.