रुग्णवाहिकेची वाहतुक कोंडीत घुसमट

रुग्णवाहिकेची वाहतुक कोंडीत घुसमट

Published on

रुग्णवाहिकेची वाहतूक कोंडीत घुसमट
रुग्णांसह नातेवाइकांना मनस्ताप
वाशी, ता. ८ (बातमीदार) ः ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे टी जंक्शनजवळील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावत असून या ठिकाणी अनेक वेळा वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे रुग्णांसह नातेवाइकांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावर वाशीकडून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर रबाळे टी जंक्शनजवळ रस्त्यांना पावसामुळे खड्डे पडले आहे. तर या सखल भागात संततधार पाऊस सुरू राहिल्यास पाणी साचून वाहने बंद पडण्याच्या घटना घडतात. त्यामुळे रबाळे टी जंक्शनपासून रबाळे रेल्वेस्थानकापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकण्याचे प्रकार घडत आहेत.
वाशी येथील पालिका रुग्णालयात अपुऱ्या सुविधांमुळे कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालय त्याचप्रमाणे जळालेल्या व्यक्तीसाठी ऐरोली येथील बर्न हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांना पाठवण्यात येते. त्यामुळे रबाळे ते घणसोलीपर्यंत मार्गावरील वाहतूक कोंडीचा रुग्णांना सामना करावा लागतो आहे. तर अंतर्गत रस्त्यांनादेखील खड्डे पडलेले आहे. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकत असल्याने रुग्ण दगावण्याचीही शक्यता आहे.

बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी
रबाळे टी जंक्शनपासून रबाळे रेल्वेस्थानकापर्यंत वाहतूक कोंडी ही नित्याचीच होत आहे. या वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका सायरन वाजवत असतानादेखील काही चालकांकडून वाट मोकळी करून दिली जात नाही. अशा बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी. तर रबाळे टी जंक्शनजवळ पडलेले खड्डेदेखील बुजवण्यात यावे, अशी मागणी नागरिक सचिन पाटील यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com