अन्यथा बीसीसीआय मान्यता होणार रद्द
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाणे पालिकेचा पांढरा हत्ती म्हणून संबोधिले जाणाऱ्या दादोजी कोंडदेव स्टेडियमचा काही वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने चेहरा मोहरा बदलला आहे. त्यात या ठिकाणी बीसीसीआयच्या नियमानुसार बदल करत स्टेडियमचा आरखडा तयार करण्यात आला आहे. असे असताना या स्टेडियममध्ये वारंवार होणाऱ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमुळे ज्या उद्देशाने हे मैदान विकसित करण्यात आले, त्या उद्देशालाच हरताळ फासले जात आहे. त्यामुळे बीसीसीआय, एमसीएने दिलेली मान्यता रद्द होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आता हे स्टेडियम यापुढे केवळ हंगामी बॉल क्रिकेट स्पर्धेसाठीच उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ठाणे पालिका क्षेत्रातील दादोजी कोंडदेव स्टेडियम ही शहराची शान समजली जाते. कालांतराने या स्टेडियममधून मिळणारे उत्पन्न व त्यावर होणारा खर्च यामध्ये मोठी तफावत दिसू लागली होती. त्यामुळे स्टेडियमला पांढरा हत्ती म्हणून संबोधिले जात होते. ही ओळख पुसण्यासाठी ठाणे पालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना आखण्यात आल्या. त्यात मागील काही वर्षांत मैदानाचा कायापालट करत या ठिकाणी राष्ट्रीय, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट सामने होतील, अशा पद्धतीने मैदानाच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च करण्यात आला. तसेच मैदानातील मुख्य खेळपट्टी व आऊट फिल्डचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर येथील मैदानाची नोंद बीसीसीआय, एमसीएमार्फत घेण्यात आल्याने येथे फक्त हंगामी बॉल क्रिकेट स्पर्धा व सरावाचे आयोजन करणे, अशी अट यापूर्वी विभागामार्फत दिली. त्यात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांसाठी दादोजी स्टेडियममध्ये घेण्यात येत आहे. तसेच टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यासाठीचा प्रस्तावही २०२३मध्ये मान्यता देण्यात आली होती; परंतु ही मान्यता दिल्यानंतर या मैदानात टेनिस बॉल स्पर्धांचेच आयोजन अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून आले. यामुळे बीसीसीआय, एमसीएने दिलेली मान्यता रद्द होऊ शकते, अशी भीती महापालिकेला वाटू लागल्याने अखेर त्यांनी टेनिस क्रिकेट स्पर्धा खेळविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. आता या ठिकाणी केवळ हंगामी बॉल क्रिकेट स्पर्धा होतील, असा प्रस्ताव पालिका प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला आहे.
टेनिस बॉल स्पर्धेमुळे मैदानाची झीज
बीसीसीआय, एमसीएमार्फत आयोजित विविध रणजी सामन्यांना प्राधान्य देता येणे शक्य नसल्याचे दिसून आले आहे. यावर्षी याचा फटका बीसीसीआयच्या महिला क्रिकेट स्पर्धा तसेच १७ वयोगटांखालील विजय हजारे या स्पर्धांचे आयोजन करता येणे शक्य झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तसेच टेनिस बॉल क्रिकेट्या स्पर्धा होत असल्याने या मैदानाची जास्त झीज होऊन नुकसान होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.