मालमत्तांची माहिती एका क्लिकवर

मालमत्तांची माहिती एका क्लिकवर

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाणे जिल्हा परिषदेच्या मालमत्ता, कोट्यवधी रुपयांच्या जागा हातच्या जाऊ नये. तसेच, अतिक्रमण झालेल्या जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पावले उचलत मालमत्तांचे सर्वेक्षण करून नऊ हजार ४४७ शोध घेण्यात आला. या मालमत्तांची नोंद त्या प्रणालीवर कसे करावे, याचे प्रशिक्षण बुधवारी (ता. ९) जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्यामुळे लवकरच त्या मालमत्तांची माहिती एका क्लिकवर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या शहर व तालुक्यांच्या ठिकाणी, तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जागा, मालमत्ता आहेत. या जागांवर अथवा मालमत्तांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. एवढेच नाही तर संबंधित मालमत्तांची कागदपत्रेच सापडत नसल्यामुळे प्रशासनाची अडचण होत असते. या जागांवर अतिक्रमण झाल्यामुळे त्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या महसुलावर होत आहे. याची दाखल घेत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी मालमत्तांचे सर्वेक्षण सुरू केले. त्यानुसार आतापर्यंत नऊ हजार ४४७ मालमत्तांचा शोध घेतला आहे. यांच्या नोंदीसाठी ऑनलाइन मालमत्ता नोंद प्रणाली https://zpthanemalmattakosh.com तयार केली आहे. या प्रणालीचे अनावरणही झाले. ही प्रणाली सुरू करून बरचसा कालावधी लोटला असतानाही त्यावर मालमत्तांची नोंद केली नसल्याची बाब समोर आली आहे. याबाबतचे वृत्तही प्रसिद्ध करण्यात आले होते.

प्रत्यक्ष जागेवर जाणार
सर्वेक्षण करण्यात आलेल्या मालमत्तांची नोंद त्या प्रणालीवर कसे करावे, याचे प्रशिक्षण बुधवारी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष जागेवर जाऊन मालमत्तांचे रेखांश, अक्षांश यांसह मिळकतीची नोंद ऑनलाइन प्रणालीवर करण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com