''परख''च्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात राज्य आठव्या स्थानावर
मुंबई शहराची आघाडी, तर उपनगराची पिछाडी
‘परख’च्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात महाराष्ट्र आठवा
मुंबई, ता. ८ ः केंद्र सरकारच्या राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेने (नॅक) केलेल्या ‘परख’च्या राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षणात महाराष्ट्राने देशात आठवा, तर राज्यात कोल्हापूरने सर्वच इयत्तांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. मुंबई शहराने तिसरी, सहावी आणि नववीत सर्वोत्तम संपादणुकीत आघाडी घेतली असून, मुंबई उपनगराची कामगिरी मात्र कमी संपादणूक करणाऱ्या जिल्ह्यांमध्ये नोंदवली गेली. विशेष म्हणजे राज्यातील ग्रामीण भागातील शासकीय शाळांतील मुलींची कामगिरी राष्ट्रीय सरासरीपेक्षा चांगली ठरली. ‘नॅक’ने राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार, परफॉर्मेन्स असेसमेंट, रिव्हीव्ह अँड अनालिसीस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टीक डेव्हलपमेंट (परख) अंतर्गत नुकतेच राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण करण्यात आले होते. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) २०२१ व परख राष्ट्रीय सर्वेक्षण २०२४ ची तुलना करता इयत्ता ९ वीतील गणित विषय वगळता सरासरी संपादणुकीत तीन टक्के वाढ झाली.
---
विषयनिहाय प्रगती (टक्क्यांमध्ये)
वर्ग भाषा गणित
तिसरी २ ३
सहावी ३ ६
नववी २ -२
----
इयत्तानिहाय जिल्ह्यांची कामगिरी
इयत्ता : तिसरी
सर्वोत्तम : कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, जळगाव
सर्वात कमी : लातूर, गडचिरोली, मुंबई उपनगर, नागपूर, पालघर
----
इयत्ता : सहावी
सर्वोत्तम : कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सातारा, मुंबई, रत्नागिरी
सर्वात कमी : वर्धा, औरंगाबाद, गोंदिया, गडचिरोली, रायगड
---
इयत्ता : नववी
सर्वोत्तम : कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई
सर्वात कमी : मुंबई उपनगर, अकोला, नंदुरबार, परभणी, गडचिरोली
--
इयत्तानिहाय विषयांची कामगिरी
इयत्ता तिसरी
भाषा : ६९ टक्के
गणित : ६४ टक्के
-----
इयत्ता सहावी
भाषा : ६२ टक्के
गणित : ५१ टक्के
---
इयत्ता नववी
भाषा : ५९ टक्के
गणित : ३८ टक्के
---
राज्यात कसे झाले सर्वेक्षण?
शाळांची संख्या : ४ हजार ३१४
शिक्षकांची संख्या : १३ हजार ९३०
विद्यार्थ्यांची संख्या : १ लाख २३ हजार ६५९
---
राज्याची तुलनात्मक कामगिरी
तिसरी : सहावा (पहिला : पंजाब)
सहावी : सातवा (पहिला : केरळ)
नववी : दहावा (पहिला : पंजाब)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.