आई ओरडल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

आई ओरडल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

Published on

आई ओरडल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

अंबरनाथ, ता. ८ (वार्ताहर) : ‘मोबाईल का बघते, अभ्यास कर’ असे आईने ओरडल्याचा राग आल्याने अल्पवयीन मुलीने बेडरूममध्ये जाऊन, पंख्याला लटकून गळफास घेतल्याची घटना सोमवारी (ता. ७) अंबरनाथमध्ये घडली. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अंबरनाथ पश्चिम भागातील सर्वोदयनगर परिसरात राहणाऱ्या पवार कुटुंबातील प्रांजली पवार (वय १४) ही नववीत शिकणारी विद्यार्थिनी असून सोमवारी सायंकाळी घरी बसून मोबाईल बघत असताना प्रांजलीची आई ‘मोबाईल का बघते, अभ्यास कर’ म्हणून ओरडली. याचा राग आल्याने प्रांजलने थेट बेडरूममध्ये जाऊन पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. मुलगी खोलीबाहेर आली नाही, म्हणून घाबरलेल्या आई व वडिलांनी आरडाओरडा केला असता शेजाऱ्यांनी खोलीचा दरवाजा तोडून बेडरूममध्ये प्रवेश केला असता मुलगी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने प्रांजलीला बदलापूरच्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com